सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जलवा, ट्विटर अकाऊंट सात कोटी फॉलोअर्स


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावर लोकप्रियता वाढत आहे. ट्विटरवर मोदी यांचे सात कोटी फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या जगातील नेत्यांमध्ये मोदींचा समावेश आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर फॉलोअर्स असणाऱ्यांत मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.Prime Minister Narendra Modi’s sucess on social media, Twitter account seven crore followers

नरेंद्र मोदी यांनी 2009 मध्ये ट्विटर अकाऊंट वापरण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. 2010 मध्ये त्यांचे एक लाख फॉलोअर्स होते. तर, 2011 मध्ये त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 4 लाखांपर्यंत पोहोचली होती. नरेंद्र मोदी त्यांच्या फॉलोअर्सशी संवाद साधण्यासाठी आणि राजकीय वक्तव्यांसाठी ट्विटरचा वापर करतात.



त्यांचे फेसबुक अकाऊंट असून युट्युब चॅनेल देखील आहे. नरेंद्र मोदी सोशल मीडियाद्वारे त्यांना द्यायचा असलेला संदेश त्यांच्या फॉलओर्सपर्यंत पोहोचवतात. स्वच्छ भारत अभियान, महिला सुरक्षा, यासारख्या इतर अभियानांसाठी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे.

कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारनं केलेली काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला होता. 2018 मधील आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये पहिल्या तीनमध्ये होते.

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे 129.8 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. ओबामा पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा नंबर लागत होता.

त्यांचे जवळपास 84 मिलियन फॉलोअर्स होते. मात्र, त्यांचे ट्विटर अकाऊंट बॅन करण्यात आले. त्यांतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसºया क्रमांकावर आले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ट्विटरवर 26.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.

तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे 19.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राअध्यक्ष जो बायडेन यांचे 30.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. त् भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे ट्विटरवर 18.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Prime Minister Narendra Modi’s sucess on social media, Twitter account seven crore followers

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात