वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानच्या समर्थनार्थ आत्तापर्यंत फक्त राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक हे पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. परंतु आता त्यांना काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिबल यांचीही साथ मिळाली आहे.Along with Nawab Malik, Kapil Sibal also backed Aryan Khan; Allegations made to the Narcotics Control Bureau!
नबाब मलिक यांच्यापाठोपाठ कपिल सिब्बल हे आर्यन खानच्या समर्थनार्थ आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या विरोधात उतरले आहेत. माझ्या शेजारच्या कोणी ड्रग्ज घेतले तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो माझ्यावर आरोप करेल आणि गुन्हा दाखल करेल काय?, अशा शब्दात कपिल सिब्बल यांनी वार केला आहे.
नबाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल बिरोला तर संपूर्णपणे खोटेच ठरवून घेतले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि भाजप यांनी संगनमत करून बॉलिवूडमधल्या नट नट्यांना ड्रग्ज केसेसमध्ये अडकवण्याचा डाव रचला आहे, असा आरोप नबाब मलिक यांनी यापूर्वीच केला आहे. त्याहीपेक्षा पुढे जाऊन त्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर वसुलीचा आरोप केला आहे.
Aryan Bail Rejection New Jurisprudence : If I am not in possession How can I be found to be in ‘ conscious possession ‘ If a friend consumes a few grams of ‘charas’ sitting next to me will I be charged for ‘ conscious consumption ‘ ! — Kapil Sibal (@KapilSibal) October 21, 2021
Aryan Bail Rejection
New Jurisprudence :
If I am not in possession How can I be found to be in ‘ conscious possession ‘
If a friend consumes a few grams of ‘charas’ sitting next to me will I be charged for ‘ conscious consumption ‘ !
— Kapil Sibal (@KapilSibal) October 21, 2021
कपिल सिब्बल यांनी देखील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे. माझ्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने काही ग्रॅम चरस ओढले तर मी चरस ओढले म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करणार का? असा खोचक सवाल त्यांनी ट्विटरद्वारे केला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम हे देखील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या विरोधात उतरले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App