जॅकलीन फर्नांडिसची ईडीकडून 7 तास चौकशी, तपास यंत्रणेचा दावा – सुकेशने अभिनेत्रीला महागडी कार केली होती गिफ्ट


देशातील सर्वात मोठ्या खंडणी प्रकरणात तिहार तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरने आपली पत्नी लीना मारिया पॉलला बॉलिवूडमध्ये एंट्री मिळवण्यासाठी खूप पैसा खर्च केला होता. 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणाचा सूत्रधार सुकेशने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला एक महागडी कार भेट दिली. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी काल म्हणजेच बुधवारी जॅकलीनच्या चौकशीनंतर हा खुलासा केल्याचे ‘इंडिया टीव्ही’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. Sukesh chandrashekhar gifted luxury car to jacqueline fernandez revealed enforcement directorate after questioning her 7 hours


विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या खंडणी प्रकरणात तिहार तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरने आपली पत्नी लीना मारिया पॉलला बॉलिवूडमध्ये एंट्री मिळवण्यासाठी खूप पैसा खर्च केला होता. 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणाचा सूत्रधार सुकेशने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला एक महागडी कार भेट दिली. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी काल म्हणजेच बुधवारी जॅकलीनच्या चौकशीनंतर हा खुलासा केल्याचे ‘इंडिया टीव्ही’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

जॅकलीनची काल ईडीने सुमारे 7 तास चौकशी केली. ईडीने पाठवलेल्या तीन समन्सकडे दुर्लक्ष केल्यानंतर बुधवारी जॅकलीन या प्रकरणात ईडीच्या चौकशीसाठी हजर झाली होती. ईडीने जॅकलीनची चौकशी करण्याची ही दुसरी वेळ आहे. या प्रकरणात जॅकलीन व्यतिरिक्त अभिनेत्री नोरा फतेहीचीही चौकशी करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, सुकेशने जॅकलीनलाच नव्हे, तर नोरा फतेहीलाही एक महागडी कार भेट दिली होती.मद्रास कॅफेमध्ये दिली मोठी रक्कम

ईडीच्या अहवालात म्हटले आहे की, 200 कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात सुकेशने जॅकलिन आणि नोरा यांच्याशिवाय चित्रपट दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला यांना मोठ्या रकमेचे आश्वासन दिले होते. सुकेशने ही लक्झरी वाहने अभिनेत्रींना खंडणीच्या पैशांचा वापर करून भेट म्हणून दिली होती.

याव्यतिरिक्त, सुकेश चंद्रशेखरला त्याची पत्नी आणि मल्याळम फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री लीना मारिया पॉलला बॉलिवूड चित्रपटात लॉन्च करायचे होते. ‘मद्रास कॅफे’ चित्रपटात लीनाने एक पात्र साकारले, ज्यासाठी तिचा पती सुकेशने भरमसाट रक्कम दिली होती. पत्नीला बॉलिवूडमध्ये आणण्यासाठी सुकेशने अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांशी बोलून पैशाबाबत कोणतेही टेन्शन न घेण्यास सांगितले होते.

ईडीने जॅकलिनची यापूर्वीही चौकशी केली आहे. त्या चौकशीत जॅकलिनने स्वतःला या प्रकरणात पीडित असल्याचे सांगितले होते. तथापि, ईडी अभिनेत्री आणि सुकेश यांच्यातील संबंधांची चौकशी करत आहे. याप्रकरणी ईडीने अद्याप जॅकलिनला क्लीन चिट दिलेली नाही.

Sukesh chandrashekhar gifted luxury car to jacqueline fernandez revealed enforcement directorate after questioning her 7 hours

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण