काँग्रेसला अध्यक्ष नाही असे म्हणणे खोटारडेपणा; मल्लिकार्जुन खर्गे बरसले कपिल सिब्बलांवर!!


वृत्तसंस्था

बेंगळूरू : काँग्रेसमध्ये जी 23 नेत्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून घमासान सुरु असताना त्यामध्ये पक्षाचे राज्यसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी भर घातली आहे. काँग्रेसला अध्यक्ष नाही असे वक्तव्य देणे म्हणजे खोटारडेपणा आहे, अशी टीका खर्गे यांनी कपिल सिब्बल यांच्यावर केली आहे.There has been a tussle in the party many times, this isn’t a new thing.

कपिल सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या 23 नेत्यांनी काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष नेमण्याची सूचना सोनिया गांधी यांना पत्र लिहून केली आहे. त्यानंतर अनेकदा पत्रकार परिषदांमध्ये कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, भूपिंडर हूडा आदी नेत्यांनी ही मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा काँग्रेस मध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावरून वाद उफाळलेला असताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी आहेत, याकडे लक्ष वेधले आहे.

त्याच वेळी त्यांनी जी 23 नेत्यांवर टीकास्त्र देखील सोडले आहे. काँग्रेसला अध्यक्ष नाही असे म्हणणे खोटारडेपणा आहे. काँग्रेसला संघर्ष नवा नाही. काँग्रेसच्या 100 पेक्षा जास्त वर्षांमध्ये संघर्षाची वेळ अनेकदा आली. पण पक्षाने त्या संघर्षावर मात करून वाटचाल पुढे चालूच ठेवली. आता देखील पक्ष आपल्यावरच्या संकटातून बाहेर पडेल, असा विश्वास खर्गे यांनी व्यक्त केला आहे. हा विश्वास व्यक्त करताना त्यांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर शंका व्यक्त करणाऱ्या जी 23 नेत्यांना “खोटारडे” या शेलक्या शब्दात संबोधले आहे.

There has been a tussle in the party many times, this isn’t a new thing.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात