जलयुक्त शिवारमुळे नव्हे, तर नद्यांमधील अवैध वाळू उपशामुळे पूर; फडणवीसांचा ठाकरे – पवार सरकारला टोला


प्रतिनिधी

नांदेड : जलयुक्त शिवार योजनेमुळे पूर आल्याचा जावईशोध ठाकरे – पवार सरकारने लावला आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की या सरकारच्या आशीर्वादाने नद्यांमधील या वाळू साठा अवैधरीत्या उपसण्यात येत आहे. त्यामुळे पूर आला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. Fadnavis’s Thackeray – Pawar tola government

देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे पत्रपरिषदेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे असे :

  •  अतिवृष्टी आणि पूर अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. सत्य परिस्थिती सरकारला समजावी आणि जेथे कमतरता आहे, तेथे त्या गोष्टींची पूर्तता व्हावी, यासाठी हा दौरा. १०० टक्के सोयाबीन गेले आहे. मोठे नुकसान सर्वत्र आहे.
  •  अनेक ठिकाणी पंचनामे करायला कुणी आलेले नाही. गेल्या आपत्तीतील मदत नाही. कर्जमाफी मिळालेली नाही. अनुदान नाही आणि अधिकारी नुकसानीचे पैसे देण्यासाठी पैसे मागत आहेत. दुहेरी मार शेतकऱ्यांना बसत आहे.
  •  पंचनामे औपचारिकता आहे. नजर आणेवारीत मोठे नुकसान दिसते आहे. त्यामुळे तातडीने मदत राज्य सरकारने दिली पाहिजे. जे विमा कंपन्या फोडायचे त्यांच्या काळात पीकविमाच मिळत नाही. सरसकट नुकसान भरपाई तातडीने द्यावी, ही आमची मागणी आहे.
  •  विदर्भ आणि मराठवाड्याच्या बाबतीत हे सरकार उदासीन आहे. आज शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहेत. उद्योगांची सवलत बंद केली आहे.
  •  जेथे नुकसान झाले, तेथे वीज बिल आणि कर्ज वसुली स्थगित करा. विमा आणि थेट मदत तत्काळ द्या. ओला दुष्काळ जाहीर केल्यावर ज्या-ज्या सवलती दिल्या जातात, त्या सर्व उपाययोजना झाल्या पाहिजे.
  •  शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे. राज्य सरकारमध्ये एकवाक्यता नाही. मदत तातडीने जाहीर केलीच पाहिजे, पण प्रशासनात जागरूकता आणायची असेल तर दौरे सुद्धा झाले पाहिजे. कदाचित मंत्री अन्य कुठल्या कामात अधिक व्यस्त असतील.
  •  जलयुक्त शिवार योजनेमुळे पूर आला हा जावईशोध आहे. या सरकारमध्ये सरकारी आशीर्वादाने अनेक नद्यांमध्ये रेतीचा अवैध उपसा सुरू आहे, त्याचा हा परिणाम आहे, ही प्रतिक्रिया मला योग्य वाटते.

Fadnavis’s Thackeray – Pawar tola government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात