…अन् ‘ED’ची टीम थेट झारखंडच्या मंत्रालयात पोहचली!


जेथे ईडीचे पथक संजीव लाल यांच्या चेंबरचा शोध घेत आहे. फाईल्स बारकाईने तपासल्या जात आहेत.


विशेष प्रतिनिधी

रांची : नेते, मंत्री, अधिकारी किंवा कोणत्याही व्यावसायिकाच्या घरावर ईडीचे छापे तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण, यावेळी ईडीची टीम थेट मंत्रालयात धडकली असून, तिथे कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.The team of ED directly reached the Ministry of Jharkhand



खरे तर ग्रामीण विकास खात्यातील भ्रष्टाचाराच्या तपासाची धग आता झारखंड मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत. मंत्र्याच्या अटक केलेल्या OSD संदर्भात ईडीचे पथक झारखंड मंत्रालयात पोहोचले आहे, जेथे ईडीचे पथक संजीव लाल यांच्या चेंबरचा शोध घेत आहे. फाईल्स बारकाईने तपासल्या जात आहेत.

ग्रामीण विकास विभागाचे मंत्री आलमगीर आलम यांचे ओएसडी संजीव लाल यांना रिमांडमध्ये घेतल्यानंतर, ईडीच्या पथकाने त्यांना झारखंड मंत्रालयातील त्यांच्या चेंबरमध्ये नेले आहे, जेथे फाइल्सची छाननी केली जात आहे. ईडीने संजीव लाल आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकले होते. ईडीच्या छाप्यात 35 कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या पथकाने जहांगीर आणि संजीव यांना अटक केली होती. या यादीत ग्रामविकास विभागातील अनेक अभियंते, अधिकारी ईडीच्या रडारवर आहेत.

The team of ED directly reached the Ministry of Jharkhand

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात