मोदींनी अतिरिक्त किंमत देऊन भेट दिल्याचा दुष्परिणाम; मधल्या मध्ये शरद पवारांनी उपटले धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचे श्रेय!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अतिरिक्त किंमत देऊन शरद पवारांची संसदेतल्या कार्यालयात भेट घेतली. त्याचा दुष्परिणाम आज दिसला. मधल्या मध्ये शरद पवारांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे श्रेय स्वतःकडे उपटून घेतले.

कॉकरोच जनता पार्टीच्या आणि विरोधकांच्या आंदोलनानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यामध्ये शरद पवारांनी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा झाली. त्याचा परिणाम आज दिसला, असा दावा शरद पवारांनी पत्रकार परिषदेत केला.

– शरद पवारांच्या निवेदनात मागमूसही नव्हता

आंदोलक विद्यार्थी आणि सरकारमध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि त्यांच्याशी झालेल्या या चर्चेचाच परिणाम म्हणून आज शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झाला, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. पण पंतप्रधान मोदींशी भेट घेऊन दिवशी शरद पवारांनी त्यांना जे निवेदन दिले, त्यामध्ये तर विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा मागमूस सुद्धा नव्हता‌. त्याचबरोबर शरद पवारांनी त्याच दिवशी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सुद्धा त्या मुद्द्याचा उल्लेख नव्हता. पण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर मात्र शरद पवारांनी त्या राजीनाम्याचे श्रेय आपल्याकडे उपटून घेतले.

आंदोलकांच्या मागणीनुसार केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा दिला. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने देशातील युवकांना नैतिक पाठबळ दिलं, त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे मी आभार मानतो.



– पंतप्रधानांशी चर्चा झाल्याचा दावा

पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीतील आणि पडद्यामागील घडामोडींवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, “युवा पिढीने शांततेने आणि संयमाने आपल्या भावना देशातील नेतृत्वाच्या समोर मांडल्या आणि त्याला यश आले. मी स्वतः पंतप्रधानांना भेटलो. त्यांना विनंती केली की, लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता असते. संवाद न ठेवण्याचे दुष्परिणाम होत असतात. तुम्ही संवाद सुरू केला पाहिजे. एक तर राजीनामा घेतला पाहिजे किंवा त्यांचे म्हणणे काय आहे हे ऐकून घेतले पाहिजे. त्यासाठी तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळ आणि तुमचे दोन-तीन कलिग यांच्याशी चर्चा करा. अभिजीत आणि त्यांचे सहकारी यांच्याशी आम्ही बोलणे केलेले आहे. त्यांनाही आम्ही सांगितलेले आहे की, सरकार तुमच्याशी सुसंवाद ठेवायला तयार असेल. बोलायचे नाही असा हट्ट धरू नका, असे मी पंतप्रधान मोदींना सांगितले आणि सुदैवाने त्यांची बोलायची तयारी होती. त्यामुळे माझं जे काही नरेंद्र मोदींसोबत बोलणं झालं, त्याचा परिणाम आज दिसला आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आज झाला आहे,” असा दावा त्यांनी केला.

– लाठीमार, अश्रुधूर हे प्रकार टाळले असते तर…

दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता. यावर शरद पवार म्हणाले की, मी युवा पिढीचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. पण नव्या पिढीला हाताळत असताना लाठीमार, अश्रुधूर हे प्रकार जर टाळले असते तर अधिक चांगले दिसले असते, असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar claims credit for Dharmendra Pradhan’s resignation!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात