बांगलादेशाच्या अध्यक्षांचा अखेर राजीनामा; सांगितलेली आणि नेमकी खरी कारणे कोणती??

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पदच्युत माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे निर्माण झालेला राजकीय दबाव आणि त्यासोबतच आरोग्याच्या समस्या या कारणांमुळे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी राजीनामा दिला.

– सांगितलेली आणि खरी राजकीय कारणे

७६ वर्षीय मोहम्मद शहाबुद्दीन यांनी प्रकृतीच्या समस्यांमुळे वैद्यकीय उपचार आणि विश्रांती घेण्यासाठी आपला कार्यकाळ संपण्यापूर्वीच दोन वर्षे आधी पद सोडले, असे त्यांच्या कार्यालयाने आणि स्थानिक वृत्तपत्रांनी नमूद केले.

पण खरंतर सरकारच्या राजकीय दबावामुळेच त्यांना पद सोडावे लागले. मोहम्मद शहाबुद्दीन हे शेख हसीना वाजेद यांच्या अवामी लीग या पक्षाचे वरिष्ठ नेते होते आणि आहेत. शेख हसीना यांच्याशी असलेल्या दीर्घकालीन निष्ठा आणि घनिष्ठ संबंधांमुळे, पंतप्रधान तारिक रहमान यांच्या प्रशासनाने त्यांना पद सोडण्यासाठी दबाव आणला होता, असे राजकीय सूत्रांनी सांगितले.



– हसीनांचे नियोजित पुनरागमन

शेख हसीना यांनी हद्दपारीतून बाहेर पडून बांगलादेशात परतण्याचा इरादा जाहीर केल्यानंतर हा दबाव अधिकच वाढला; कारण हसीना यांच्या पदच्युत झालेल्या सत्ताकाळातले ते एकमेव उच्चपदस्थ नेते उरले होते. त्यांच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात शेख हसीना बांगलादेशात परतल्या असत्या, तर शेख हसीना यांच्यावर वेगवेगळ्या आरोपांखाली खटला चालविण्यात मोहम्मद शहाबुद्दीन यांनी कायदेशीर अडथळा उत्पन्न केला असता.

– नाराजी तर आधीपासूनच

संक्रमणकालीन प्रशासनाकडून म्हणजे मोहम्मद युनूस यांच्या काळात आपल्याला बाजूला सारले गेल्याची आणि आपला अपमान झाल्याची भावना मोहम्मद शहाबुद्दीन यांनी यापूर्वी व्यक्त केली होती; यामध्ये दूतावासांमधून त्यांची छायाचित्रे काढून टाकल्यासारख्या घटनांचा समावेश होता. मोहम्मद शहाबुद्दीन यांनी डिसेंबर 2025 मध्येच अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा इरादा व्यक्त केला होता.

President of Bangladesh, Mohammed Shahabuddin, has submitted his resignation letter to Major (Retd.) Hafiz Uddin Ahmed, Speaker of the Jatiya Sangsad, citing severe health reasons.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात