विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणायचे ठरविले आहे. राहुल गांधी पंतप्रधान मोदींना पर्यायी नेतृत्व देऊ शकत नाहीत, असे स्पष्ट मत तृणमूल काँग्रेसचे नेते उघडपणे बोलताना दिसत आहेत. खुद्द गुड्डू ममता बॅनर्जी मात्र सध्या आपल्याला विरोधकांची एकजूट महत्त्वाची वाटते असे सांगताना दिसत आहेत.’Rahul Gandhi cannot defeat PM Modi’: TMC projects Mamata Banerjee as Opposition’s face
तृणमूळ काँग्रेसचे वरिष्ठ खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी ममता बॅनर्जी यांच्या पंतप्रधान पदासाठी पुढाकार घेतला आहे. ते म्हणाले, की राहुल गांधी यांचे नेतृत्व मी गेले काही वर्षे पहातो आहे. त्यांनी स्वतःला पंतप्रधान मोदींचा पर्याय म्हणून कधीच पुढे आणले नाही.
स्वतःचे राष्ट्रीय पातळीवरचे नेतृत्व त्यांनी गेल्या दहा वर्षात विकसित केलेले नाही. मात्र ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपचा निर्णायक पराभव केला. त्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या. आता त्यांचे नेतृत्व देशपातळीपर्यंत पोहोचले आहे. आमच्या दृष्टीने ममता बॅनर्जी याच सर्व विरोधी पक्षांच्या मिळून पंतप्रधानपदाचा उमेदवार असतील.
सुदीप बंदोपाध्याय यांनी उघड कोणी राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधानपदाच्या रेस मधून बाजूला काढून ममता बॅनर्जी यांचे नाव पुढे आणले आहे. त्याला तृणमूळ नेत्यांचा एकमुखी पाठिंबा आहे.
स्वतः ममता बॅनर्जी मात्र जाहीर सभांमध्ये भाषणांमध्ये आपल्याला कोणत्याही पदाची लालसा नाही. आपण विरोधी पक्षांच्या एकजुटीला महत्त्व देतो. त्यात काँग्रेस देखील आमच्यासाठी महत्त्वाचा घटक पक्ष आहे, असे सांगताहेत.
ज्या आक्रमक पद्धतीने त्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत भाजप व तोफा डागत होत्या ती आक्रमकता त्यांनी स्वतःच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आम्ही कायम ठेवली आहे.
यातून त्या स्वतः चा आक्रमक चेहरा मतदान मतदारांपुढे ठेवत आहेतच. पण त्याच वेळी त्या आपला हा प्रचार देशपातळीवर पोहोचण्याची ही व्यवस्थित काळजी घेत आहेत. त्यातून फक्त तृणमूल काँग्रेसचेच नेते नव्हे तर बाकीच्या विरोधी पक्षांचे नेते देखील आपल्याकडे पंतप्रधान मोदी यांना पर्यायी नेतृत्व म्हणून पाहतील, असा ममता बॅनर्जी यांचा राजकीय होरा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App