लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली चार धाम यात्रा आजपासून सुरु


 

डेहराडून – देशातील भाविकांसाठी चार धाम यात्रेला शनिवारपासून (ता. १८) प्रारंभ होणार आहे. उच्च न्यायालयाने गुरुवारी मंजुरी दिल्यानंतर उत्तराखंड सरकारने शुक्रवारी ही घोषणा केली. कोरोनाच सावट असल्याने यात्रेवर बंदी होती.Char Dham yatra begins from today

दोन्ही डोस घेतलेले तसेच कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असलेले भाविक वार्षिक यात्रेत भाग घेऊ शकतील. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी सांगितले की, सरकारने यात्रेची तयारी सुरु केली आहे. पर्यटन खाते लवकरच प्रमाणित दिशानिर्देश जारी करेल.



राज्याचे मुख्य सचिव डॉ. एस. एस. संधू यांनी यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. पर्यटनसह विविध खात्यांचे अधिकारी तसेच देवस्थान व्यवस्थापन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या.

चमोली, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी आणि पौडी येथील जिल्हा दंडाधिकाऱ्यांना रस्ते सुरक्षा, स्वच्छता, गर्दीचे नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, यात्रा मार्गावर चाचण्या आणि कोरोना नियमांची पुर्तता यासाठी सूचना देण्यात आल्या.

Char Dham yatra begins from today

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात