GST Council बैठकीचे निर्णय : स्विगी-झोमॅटोसारख्या अ‍ॅप्सवरून अन्न मागवणे महाग, काय-काय झाले स्वस्त? वाचा सविस्तर…

GST council 45th meeting Decision finance minister of India Nirmala Sitharaman tax concession Covid drugs

GST council : जीएसटी कौन्सिलची बैठक संपली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सना 5 टक्के जीसॅटच्या कक्षेत आणण्याच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या आहेत. यामुळे स्विगी, झोमॅटो या अ‍ॅप्सवरून अन्न पदार्थांची मागणी करणे महाग होईल. Swiggy, Zomato वर 5 टक्के GST लागू होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, कार्बोनेटेड फ्रूट ड्रिंक्स आणि ज्यूसवर 28 टक्के + 12 टक्के जीएसटी लागू होईल. हे निर्णय 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील. GST council 45th meeting Decision finance minister of India Nirmala Sitharaman tax concession Covid drugs


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जीएसटी कौन्सिलची बैठक संपली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सना 5 टक्के जीसॅटच्या कक्षेत आणण्याच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या आहेत. यामुळे स्विगी, झोमॅटो या अ‍ॅप्सवरून अन्न पदार्थांची मागणी करणे महाग होईल. Swiggy, Zomato वर 5 टक्के GST लागू होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, कार्बोनेटेड फ्रूट ड्रिंक्स आणि ज्यूसवर 28 टक्के + 12 टक्के जीएसटी लागू होईल. हे निर्णय 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील.

काय-काय झाले स्वस्त?

(1) कोरोनाशी संबंधित औषधांवर जीएसटी सूट 31 डिसेंबर 2021 पर्यंत सुरू राहील. यापूर्वीच्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या 44 व्या बैठकीत काळ्या बुरशीच्या औषधांवरील कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या व्यतिरिक्त, कोरोनाशी संबंधित औषधे आणि रुग्णवाहिकांसह इतर उपकरणांवरही करांचे दर कमी करण्यात आले. बैठकीत कोविडच्या लसीवर 5% जीएसटी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी दरातील ही कपात डिसेंबर 2021 पर्यंत लागू राहील.

(2) बायोडिझेलवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे.

(3) लोह, तांबे, जस्त आणि अॅल्युमिनियमवर जीएसटी वाढवण्यात आला आहे.

या वस्तूंवरील करामध्ये कपात

ऑक्सिमीटरवर 12% वरून 5% पर्यंत कमी.
हँड सॅनिटायझरवरील कर 18% वरून 5% केला.
व्हेंटिलेटरवरील 12% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आले.
रेमडेसिव्हिरवर 12% वरून 5% केले.
मेडिकल ग्रेड ऑक्सिजनवर 12% वरून 5% पर्यंत कमी.
पल्स ऑक्सीमीटरवरील कर 12% वरून 5% करण्यात आला आहे.
ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरवरील कर 12% वरून 5% केला आहे.
इलेक्ट्रिक फर्नेसेसवरील कर 12% वरून 5% केला आहे.
तापमान मोजण्याच्या साधनांवरील कर 12% वरून 5% करण्यात आला आहे.
हाय-फ्लो नेजल कॅन्युला डिव्हाइसवरील कर 12% वरून 5% करण्यात आला आहे.
हेपरिन औषधावरील कर 12% वरून 5% करण्यात आला आहे.
कोविड चाचणी किटवर 12% ऐवजी 5% कर लावण्यात आला आहे.

जीएसटीमुळे सरकारच्या उत्पन्न सातत्याने वाढ

अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ऑगस्ट 2021 मध्ये एकूण जीएसटी महसूल 1,12,020 कोटी रुपये राहिला, ज्यात केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) साठी 20,522 कोटी रुपये, राज्य जीएसटी (एसजीएसटी) साठी 26,605 कोटी रुपये, इंटिग्रेटेड जीएसटीसाठी 56,247 कोटी रुपये (मालाच्या आयातीवर 26,884 कोटीसह) समाविष्ट आहेत. सेसवर 8,646 कोटी (वस्तूंच्या आयातीवर जमा केलेल्या 646 कोटींसह) आहे. ऑगस्टमध्ये गोळा केलेली रक्कम मात्र जुलै 2021 मधील 1.16 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी आहे.

ऑगस्ट 2021 मध्ये जीएसटी महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यापेक्षा 30 टक्के जास्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये जीएसटी संकलन 86,449 कोटी रुपये होते. मंत्रालयाने म्हटले आहे की ऑगस्ट 2019 मध्ये जीएसटी संकलन 98,202 कोटी रुपये होते. अशाप्रकारे, या वर्षी ऑगस्टमध्ये संकलन ऑगस्ट 2019 च्या तुलनेत 14 टक्के अधिक होते.

GST council 45th meeting Decision finance minister of India Nirmala Sitharaman tax concession Covid drugs

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात