मराठा आरक्षणप्रश्नी महाराष्ट्राचे खासदार घेऊन मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपतींना भेटणार ; भाजप खासदार संजयकाका पाटील यांचा निर्धार


वृत्तसंस्था

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत आलेला निर्णय निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया सांगलीचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील सर्व खासदार यांना एकत्र करून या प्रश्नी मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांची भेट घेणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. On Maratha Reservation All MP’S From Maharashtra We Will Meet Chief minister, prime minister And President Also : Bjp MP sanjaykaka patil

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने काल रद्द केले होते. तसेच ते लागू करण्याचा अधिकार महाराष्ट्र विधिमंडळाला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हंटले होते. मग, तो अधिकार राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. न्यायालयाच्या निर्णयावर संजयकाका पाटील यांनी फेसबुकवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.खासदार संजयकाका पाटील पुढे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्रातील खासदारांना एकत्र आणणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे.

On Maratha Reservation All MP’S From Maharashtra We Will Meet Chief minister, prime minister And President Also : Bjp MP sanjaykaka patil

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात