‘निपाह’मुळे केरळमध्ये दहशत, सरकारने लोकांना घरात राहण्याचा दिला सल्ला!

 पुन्हा लॉकडाऊन होणार का?,  सर्व शैक्षणिक संस्था पुढील दोन दिवस बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

विशेष प्रतिनिधी

केरळ  : कोरोनापेक्षाही धोकादायक असलेल्या निपाह व्हायरसने केरळ सरकारसह जनतेलाही घाबरवले आहे. एकेकाळी शेजारील बांगलादेशातील लोकांना त्रास देणारा निपाह व्हायरस केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात वेगाने पसरत आहे, त्यानंतर तो इतर ठिकाणी पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. Nipah virus infection increased in Kerala

मास्क घालण्याव्यतिरिक्त, लोकांना या विषाणूची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ७७ लोकांवर नजर ठेवण्यात येत असल्याचे वृत्त आहे. यासोबतच जास्त धोका असलेल्या आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना निपाह मास्क घालण्यास सांगितले आहे.

दरम्यान, बुधवारी केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात निपाह विषाणूचा पाचवा रुग्ण आढळून आला असून, त्यानंतर सावधगिरी म्हणून सर्व शैक्षणिक संस्था पुढील दोन दिवस बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Nipah virus infection increased in Kerala

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात