अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांची आत्महत्या

वृत्तसंस्था

प्रगायराज : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज (वय ७२) प्रयागराज येथील निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आले. त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचा उल्लेख त्यात आहे. Narendra giri Maharaj commits sucide

त्यांच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये अनेकांची नावे असल्याची चर्चा आहे. नरेंद्रगिरी ७२ वर्षांचे होते. एप्रिलच्या प्रारंभी त्यांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांनी आश्रमात स्वतःचे विलगीकरण केले होते.



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खोलीचा दरवाजा आतून बंद होता. तो तोडून काढावा लागला. त्यांनी नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे आढळून आले.
दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी याबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी हरिद्वारमधील कुंभमेळ्यादरम्यान नरेंद्रगिरी यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी अखिलेश यांना कोरोना संसर्ग झाला होता.

Narendra giri Maharaj commits sucide

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात