मीटूचा आरोप असलेले चरणजीत मुख्यमंत्रिपदासाठी लायक नाहीत, काँग्रेसने त्यांना हटवावे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांची मागणी

Charanjit is not fit for CM post, Congress should remove him, demands National Womens Commission chairperson

National Womens Commission : पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा आज शपथविधी सोहळा पार पडला. चरणजीत यांच्या निवडीबरोबरच त्यांच्या वादांनी पुन्हा डोके वर काढले आहे. याच वर्षी मे महिन्यात चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर मीटूचे आरोप झाले होते. एका महिला आयएएस अधिकाऱ्यांना त्यांनी अभद्र मेसेजेस पाठवल्याचा आरोप होता. यावरून आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी चरणजीतसिंग आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर टीका केली आहे. Charanjit is not fit for CM post, Congress should remove him, demands National Womens Commission chairperson


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा आज शपथविधी सोहळा पार पडला. चरणजीत यांच्या निवडीबरोबरच त्यांच्या वादांनी पुन्हा डोके वर काढले आहे. याच वर्षी मे महिन्यात चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर मीटूचे आरोप झाले होते. एका महिला आयएएस अधिकाऱ्यांना त्यांनी अभद्र मेसेजेस पाठवल्याचा आरोप होता. यावरून आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी चरणजीतसिंग आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर टीका केली आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा वृत्तसंस्थेला म्हणाल्या की, “2018 मध्ये मीटू चळवळीदरम्यान त्यांच्यावर (पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी) आरोप करण्यात आले होते. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली होती आणि त्यांना हटवण्याची मागणी करत धरणे आंदोलनही केले होते, पण काहीही झाले नाही. आज त्यांना एका महिलेच्या नेतृत्वातील पक्षाने पंजाबचे मुख्यमंत्री बनवले आहे. हा सरळसरळ विश्वासघात आहे. ते महिलांच्या सुरक्षेसाठी धोका आहेत. त्यांच्याविरोधात चौकशी झाली पाहिजे. ते मुख्यमंत्री होण्यास लायक नाहीत. मी सोनिया गांधींना आग्रह करते की त्यांना मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकावे.”

चरणजीत सिंग चन्नी यांनी आज पंजाबचे 16वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री होण्याचा मानही त्यांना जातो. जेव्हा सर्वप्रथम मीटूचे आरोप झाले होते तेव्हा चन्नी यांनी सारवासारव केली होती. ते म्हणाले होते की, चुकून त्यांच्याकडून महिला आयएएस अधिकाऱ्याला तसे संदेश पाठवण्यात आले. याप्रकरणी त्या महिला अधिकाऱ्याने अधिकृत तक्रार दिलेली नव्हती, परंतु राज्य महिला आयोगाने स्वत:हून दखल घेऊन चन्नी यांच्याविरोधात आघाडी उघडली होती. आता चन्नी यांना थेट मुख्यमंत्रिपदावर बसवल्यामुळे काँग्रेसवर चहुबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. महिला सक्षमीकरण व महिलांच्या संरक्षण तसेच अधिकारांवर हिरीरीने भूमिका मांडणाऱ्या राहुल गांधींना यानिमित्ताने लक्ष्य केले जात आहे.

Charanjit is not fit for CM post, Congress should remove him, demands National Womens Commission chairperson

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात