मणिपूर मधल्या महिला अत्याचाराची ममतांच्या बंगालमध्ये वारंवार पुनरावृत्ती; तरीही लिबरल्सची अळीमिळी गुपाचिळी!!


वृत्तसंस्था

कोलकाता : मणिपूरमध्ये दोन महिलांची निर्वस्त्रावस्थेत भेंड काढल्यानंतर संपूर्ण देशभरात प्रचंड संतापाचे वातावरण असताना विरोधकांनी त्यावरून राजकारण तापवले असताना पश्चिम बंगालमध्ये एका पाठोपाठ एक महिला अत्याचारच्या तीन घटना समोर आल्या, पण त्यावर मात्र देशातले विरोधक आणि लिबरल्स मूग गिळून गप्प बसले आहेत.Manipur’s violence against women repeated in Mamata’s Bengal; Yet the Liberals’

पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या राजवटीत मालदा येथे जमावाने दोन महिलांना बेदम मारहाण केली आणि नंतर त्यांना अर्धनग्न केले. ही घटना 19 जुलैची आहे. त्याचा व्हिडिओ आज शनिवारी समोर आला. महिलांच्या एका टोळक्याने दोन महिलांना घेरल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असून त्या महिलांचे केस ओढून त्यांना चप्पलने मारहाण करीत आहेत. त्यांचे कपडेही फाडत आहेत.



पीडित महिला आदिवासी

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या मते, ही घटना मालदातील बामनगोला पोलिस स्टेशनच्या पाकुआ हाट भागात घडली. दोन्ही पीडित ​​​​​​​महिला आदिवासी आहेत. हिंसक जमाव महिलांना मारहाण करत असताना आणि त्यांचे कपडे फाडत असताना पोलिस मात्र प्रेक्षक बनून उभे होते.

8 जुलै रोजी घडली अशीच घटना

पश्चिम बंगालमध्ये महिलांवर अत्याचाराची ही पहिलीच घटना नाही. पंचायत निवडणुकीतील हिंसाचाराच्या वेळीही एका महिलेची विवस्त्र परेड काढण्यात आली होती. शुक्रवारी, हुगळी जिल्ह्यातील भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी सांगितले की, 8 जुलै रोजी झालेल्या पंचायत निवडणुकीदरम्यान भाजप उमेदवारावर टीएमसी कार्यकर्त्यांनी लैंगिक अत्याचार केले होते.

त्या घटनेचा उल्लेख करत लॉकेट चॅटर्जीही रडू लागला. हावडा जिल्ह्यातील दक्षिण पंचला भागात ही घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसात तक्रारही दाखल केली होती.

पीडितेने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, टीएमसी उमेदवार हिमंता रॉय आणि इतरांनी मतदान केंद्रावर आधी महिलेवर हल्ला केला. त्यानंतर काहींनी साडी फाडली. महिलेचा आरोप आहे की तिला विवस्त्र होण्यास भाग पाडले आणि सार्वजनिक ठिकाणी विनयभंग केला.

बंगालमध्ये महिला अत्याचाराच्या आशा घटना घडूनही काँग्रेस सह तृणमूळ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस डावे पक्ष यांचे नेते तर गप्प आहेतच. पण देशातल्या कुठल्याही घटनांवर सोशल मीडियात राळ उडवणारे जावेद अख्तर, नसरुद्दीन शाह, स्वरा भास्कर रेणुका शहाणे आमिर खान हे बॉलिवूड सेलिब्रिटी आणि रामचंद्र गुहा, करण थापर यांच्यासारखे लिबरल मूग गिळून गप्प आहेत. मणिपूर मधल्या घटनेवर त्यांनी प्रतिक्रिया तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या, पण बंगाल, राजस्थान, बिहार मधल्या घटनांवर मात्र दुटप्पी भूमिका घेत ते गप्प बसून आहेत.

Manipur’s violence against women repeated in Mamata’s Bengal; Yet the Liberals’

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात