“पलक” झपकतेही अचूक शॉट; 17 वर्षांच्या पलकचा आशियाई स्पर्धेत सुवर्णवेध!!; टीम इंडियाला रौप्यपदक


वृत्तसंस्था

होंगजू : “पलक” झपकतेही अचूक शॉट लावत 17 वर्षांच्या पलकने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णवेध घेतला. 10 मीटर एअर पिस्टल शूटिंग स्पर्धेत पलक गुलियाला सुवर्णपदक मिळाले, तर तिची सहकारी 18 वर्षांची ईशा सिंह रौप्य पदकाची मानकरी ठरली.An accurate shot even with the blink of an “eyebrow”; 17-year-old Palak wins gold in Asian Games!!; Silver medal for Team India



 

ईशा सिंह, दिव्या थडिगोलच्या हिच्यासह पलकच्या टीमने या क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे, पण स्वतः पलकने वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून भारताला आठवे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. भारताच्या खात्यात आता एकूण 27 पदके आली असून टेनिस, हॉकी, क्रिकेटमध्ये भारताला सुवर्णपदकांची आशा आहे.

घोडेस्वारी, अथलेटिक्स, रोईंग, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात भारताला वेगवेगळी पदके मिळाली आहेत. 3 पी एअर रायफल 50 मीटर शूटिंग मध्ये भारतीय पुरुष टीमला सुवर्णपदक मिळाले आहे.

पलक गुलिया मूळची हरियाणातल्या झज्जरची असून तिने सुवर्णपदक जिंकण्याची बातमी येतात संपूर्ण गावात जल्लोष झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून तिन्ही पदक विजेत्या वीरांगनांचे अभिनंदन केले आहे.

An accurate shot even with the blink of an “eyebrow”; 17-year-old Palak wins gold in Asian Games!!; Silver medal for Team India

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात