वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतात वृद्धांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दशकांत तरुण देश हे बिरूद हिरावून घेतले जाऊ शकते. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या (यूएनएफपीए) अहवालात ही माहिती समोर आली. त्यानुसार भारतात अभूतपूर्व वेगाने वाढणारी वृद्धांची लोकसंख्या शतकाच्या मध्यात लहान मुलांच्या संख्येपेक्षा जास्त होईल.भारत हा सध्या तरुण आणि तरुणांची सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. यूएनएफपीच्या ‘इंडिया एजिंग रिपोर्ट 2023’ नुसार राष्ट्रीय स्तरावर लोकसंख्येमध्ये वृद्धांचा (60 हून जास्त) वाटा 2021 मध्ये 10.1% वरून 2036 मध्ये 15% आणि 2050 पर्यंत 20.8% पर्यंत वाढेल. शतकाच्या अखेरीस वृद्ध लोकांचा वाटा एकूण लोकसंख्येच्या 36% असेल. 2010 पासून वृद्ध झपाट्याने वाढ झाली आणि 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकसंख्येमध्ये घट झाली आहे.India Aging Report 2023: India’s population is aging at a rapid rate, 36 percent by the end of the century
दक्षिणेतील वृद्ध लोक राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त
बहुतेक दक्षिणेकडील राज्ये आणि हिमाचल आणि पंजाबसारख्या उत्तरेकडील राज्यांमध्ये वृद्ध लोकसंख्या 2021 मध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त होती. येत्या 15 वर्षांत अंतर वाढेल. 1961 पासून वृद्ध लोकसंख्येत वाढ . 1961-71 दरम्यान ते 32% आणि 1981-91 रम्यान 31% होते. ते 1991-2001 (35%) वेग वाढला. 2021-31 दरम्यान 41% पर्यंत पोहोचेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App