जाणून घ्या, कोणत्या अष्टपैलू खेळाडूला संघातून वगळले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आयसीसी विश्वचषक २०२३ चे बिगुल लवकरच वाजणार आहे. ही स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पण त्याआधी सर्व 10 संघांना 2-2 सराव सामने खेळायचे आहेत. या स्पर्धेसाठी सर्व १० देशांनी आधीच आपले संघ जाहीर केले आहेत. ICC World Cup 2023 Indian squad announced for the World Cup
मात्र या संघामधील बदलासाठी अंतिम तारीख २८ सप्टेंबर ठेवण्यात आली होती. अशा परिस्थितीत भारतीय संघाने या दिवशी आपल्या संघात मोठा बदल करून अंतिम संघ घोषित केला आहे. दुखापतीने त्रस्त असलेला स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याला वगळण्यात आले आहे.
त्याच्या जागी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश करण्यात आला आहे. अलीकडेच अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही संधी देण्यात आली होती, जिथे त्याने दमदार कामगिरी केली होती. तर मालिकेतील तिसर्या आणि शेवटच्या वनडेपर्यंतही अक्षर तंदुरुस्त होऊ शकला नाही.
भारतीय संघाला विश्वचषकापूर्वी २ सराव सामने खेळायचे आहेत. ३० सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे इंग्लंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळायचा आहे. यासाठी अश्विनसह संपूर्ण टीम गुवाहाटीला पोहोचली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App