“…हीच स्वामिनाथन यांना खरी श्रद्धांजली ठरेल” राज ठाकरे यांचं विधान!


…बहुदा तिथेच त्यांना दुःख निवारणाची प्रेरणा मिळाली असावी, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : स्वतंत्र भारताच्या पहिल्या  हरित क्रांतीचे जनक मानले गेलेले ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ व सुप्रसिद्ध वैज्ञानिक एम. एस. स्वामीनाथन यांचं  आज (गुरुवार) वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनावर सर्वचस्तरातून दु:ख व्यक्त होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. MNS president Raj Thackeray paid tribute to Swaminath

राज ठाकरे म्हणाले की,  ”भारतातील हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामिनाथन ह्यांचं निधन झालं. ह्या देशाला भुकेपासून मुक्त करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आणि आज देशाचा अन्नाचा तुटवडा कमी झाला आहे त्याचं निःसंशयपणे श्रेय स्वामिनाथन ह्यांना जातं.”

याचबरोबर “शेती जनुकशास्त्र आणि ग्रामीण अर्थशास्त्र ह्यावर त्यांचं मूलभूत चिंतन होतं. स्वातंत्र्यानंतर एका महिन्यांत दिल्लीला स्वामिनाथन आले त्यावेळेला त्यांनी दिल्ली स्टेशनातच फाळणीचा हिंसाचार पाहिला होता, बहुदा तिथेच त्यांना दुःख निवारणाची प्रेरणा मिळाली असावी. दारिद्र्य आणि भूक ह्या दुःखाच्या दोन चेहऱ्यांशी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.” असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

याशिवाय, ”आज हवामानबदलामुळे शेतीपुढील आव्हानं गंभीर आहेत. शेती करावी का आणि केली तर का करावी असं वैफल्य शेतकऱ्यांच्या मनात दाटून येत असताना स्वामिनाथन ह्यांच्यासारखा द्रष्टा ह्या जगात नाही हे खूप वाईट आहे. अर्थात स्वामिनाथन ह्यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाचा अहवाल आजपर्यंत भारतात कुठल्याही सरकारांनी स्वीकारला नाही हे दुर्दैव आहे. हा अहवाल स्वीकारून त्यावर अंमलबाजवणी करणे हीच स्वामिनाथन ह्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. एम.एस. स्वामिनाथन ह्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली.” अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

MNS president Raj Thackeray paid tribute to Swaminath

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात