‘राजद’ने मनोज झा यांच्यासाठी Y श्रेणीची सुरक्षा मागितली, जाणून घ्या काय आहे कारण?


राजदने केंद्रीय मंत्री अमित शहा यांना पत्र पाठवले आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर झालेल्या चर्चेदरम्यान मनोज झा यांनी ठाकूर यांच्यावर एक जुनी कविता ऐकवली होती.राज्यसभा खासदार मनोज झा यांच्या या कवितेवर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.  RJD seeks Y category security for Manoj Jha

राजदने एक भीती व्यक्त केली आहे की, मनोज झा यांच्या जीवाला धोका आहे, या पार्श्वभूमीवर राजदने केंद्रीय मंत्री अमित शहा यांना पत्र लिहून मनोज झा यांना वाय श्रेणीच्या सुरक्षेची मागणी केली आहे.

मनोज झा यांच्या या कवितेवर माजी खासदार आनंद मोहन आणि त्यांचा मुलगा आरजेडीचे आमदार चेतन आनंद यांनी बुधवारी आक्षेप घेतला होता. याशिवाय जेडीयू एमएलसी संजय सिंह यांनी मनोज झा यांना ताकीद दिली की त्यांनी ठाकूरांची छेड काढू नये. भाजपासह बिहारमधील अनेक विरोधी पक्ष नेतेही मनोज झा यांच्या कवितेवर हल्लाबोल करत आहेत.

आमदार सुखपाल खैरांच्या अटकेवरून पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये संघर्ष!

राजदने लिहिलेल्या पत्रात भाजपा आमदार राघवेंद्र प्रताप सिंह यांनी मनोज झा यांची मान कापण्याचे विधान केल्याचे म्हटले आहे. याशिवाय धमक्या देणाऱ्या नेत्यांमध्ये नीरज बबलूचेही नाव घेण्यात आले आहे.

RJD seeks Y category security for Manoj Jha

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात