भाजपची करा शितावरून भाताची परीक्षा; पण घराणेशाही नेत्यांची घरातल्याच भाकऱ्या फिरवण्याची आहे का क्षमता??


नाशिक : भाजपची करा शितावरून भाताची परीक्षा; घराणेशाही नेत्यांची घरातल्याच भाकऱ्या फिरवण्याची आहे का क्षमता??, हे शीर्षक वाचून जरा विचित्र वाटेल पण ते विचित्र असण्यापेक्षा बोचरे जास्त आहे. कारण ते घराणेशाहीतल्या नेत्यांच्या राजकीय भाकऱ्या फिरवण्याच्या क्षमतेवर ठळक प्रश्नचिन्ह लावणारे आहे. BJP may bring major reshuffle in candidates for loksabha elections, but dynastic parties are preparing to carry forward their own dynasties only

मध्य प्रदेशात भाजपने 3 केंद्रीय मंत्री आणि 7 खासदार यांना पहिल्या दोन याद्यांमध्येच विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन भाजपश्रेष्ठींनी राजकीय दृष्ट्या शितावरून भाताची परीक्षा पाहणे भाग पाडले आहे. 234 उमेदवारांपैकी फक्त 78 उमेदवारांची यादी जाहीर करताना भाजपने आधीच फार मोठे फेरबदल घडवले आहेत, तर 152 उरलेल्या जागांमध्ये भाजप आणखीन किती फेरबदल घडवेल याची चुणूकच पहिल्या दोन याद्यांमधून पक्षाने दाखविली आहे.

त्या पलीकडे जाऊन शितावरून भाताची परीक्षा हा निकष चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने लावला, तर भाजप आपल्या उमेदवारांमध्ये केवढे मोठ्या प्रमाणावर फेरबदल करेल, याची झलक पाहायला मिळू शकते. याचा भाकरी फिरवणे या म्हणीतून अर्थ लावायचा झाला, तर भाजपश्रेष्ठी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशभरात 100 च्या आसपास भाकऱ्या फिरवतील, हेच स्पष्ट होते.

लोकसभेत सध्या भाजपचे 303 खासदार, देशातल्या सर्व विधानसभा मिळून साधारण 1300 + आमदार आणि देशभरातल्या मोठ्या महापालिकांमध्ये 5000 + लोकप्रतिनिधी नगरपालिका, पंचायत समिती यामध्ये 10000 + लोकप्रतिनिधी ही भाजपची ताकद आहे आणि आता तर भाजपने 33% महिला आरक्षण कायदा देखील मंजूर करून घेतला आहे.

महिला आरक्षणाची अंमलबजावणी जरी जनगणना आणि मतदारसंघाची पूर्ण फेररचना झाल्यानंतर अपेक्षित असली, तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप क्रांतिकारक निर्णय घेऊन आपल्या पक्षापुरता किंवा एनडीए आघाडी पुरता 33% महिला आरक्षणाचा निर्णय राबविणार नाही कशावरून!!… इथेच खरी भाकरी फिरवण्यातली राजकीय मेख आहे…!!

अर्थात तेही बरोबरच आहे म्हणा, ज्याचे खटले मोठे, त्याचे चुलखंड मोठे, तवे मोठे, भाकऱ्यांची संख्याही फार… त्यामुळे भाकऱ्या फिरवणेही जास्त हे स्वाभाविक आहे, पण मूळात ज्यांच्या घरातच तीन चतकोर भाकऱ्या आहेत, त्या फिरवून फिरवून फिरवणार तरी किती?? आणि त्या करपल्याशिवाय राहणार तरी कशा?? हा खरा प्रश्न आहे.

या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजप मोठ्या प्रमाणावर फेरबदल घडवून महिलांना जास्तीत जास्त “पॉलिटिकली अकॉमोडेट” करण्याचा निर्णय घेत असताना महाराष्ट्रातून काय बातम्या येतात, तर “पुतण्याची काकांवर मात”, “कल्पवृक्ष कन्येसाठी बाबांनी लाविला”, “नेते आपल्या मुलांना आणि मुलींना मतदारसंघांमध्ये ऍडजेस्ट करणार”, “कन्याच पित्याचा राजकीय वारसा चालवणार,” ही बातम्यांचे शीर्षके आहेत. म्हणजे घरातल्या घरातच अर्धी किंवा तीन चतकोर भाकरी फिरणार अशा आशयाच्या या बातम्या आहेत!!

एकीकडे 33 % महिला आरक्षणातून संपूर्ण देशाचे राजकीय – सामाजिक – सांस्कृतिक भवितव्य बदलण्याची भाषा पंतप्रधान मोदी वापरत आहेत, पण महाराष्ट्रात मात्र घराणेशाहीतून चालणारे पक्ष या महिला आरक्षणातून घराण्यातल्याच महिलांचे आरक्षण बळकट करण्याच्या मागे लागल्याचे चित्र दिसते आहे!!

BJP may bring major reshuffle in candidates for loksabha elections, but dynastic parties are preparing to carry forward their own dynasties only

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात