विशेष प्रतिनिधी
पुणे : सई ताम्हणकर सध्याच्या मराठी विश्वातलं आघाडीचे नाव. सैन्या मराठी सह बॉलीवूडमध्ये देखील आपला बस्तान चांगल्या प्रकारे बसवलं आहे. मराठी चित्रपट विश्वातली बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री अशी सही ची ओळख आहे. Sai Tamhankar new home
सईने नुकतंच मुंबईत स्वत:चं पहिलं आलिशान घर खरेदी केलं आहे. मूळची सांगलीची असलेली सई ताम्हणकर आता खऱ्या अर्थाने मुंबईकर झाली आहे. नव्या घराबरोबरच तिने नुकतंच तिचं युट्यूब चॅनेल सुद्धा सुरु केलं आहे. या युट्यूब चॅनेलवर सईने तिच्या आलिशान घराची पहिली झलक शेअर केली आहे.
या व्हिडीओवर सध्या मराठी विश्वातील कलाकार कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री प्रिया बापटने सईसाठी खास पोस्ट शेअर करतकरत तिचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram A post shared by Sai (@saietamhankar)
A post shared by Sai (@saietamhankar)
सई ताम्हणकर आणि प्रिया बापट या दोघीही सध्या मराठी कलाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. या दोघीही एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे प्रियाने लाडक्या मैत्रिणीला नव्या घरासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. सई तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी २००५ मध्ये मुंबईत आली. सांगलीत तिचं संपूर्ण बालपण गेलं. तेव्हापासून सई आई-बाबांच्या, नातेवाईकांच्या आणि भाड्याच्या अशा एकूण १० घरांमध्ये राहिली. त्यामुळे नव्या घराला अभिनेत्रीने ‘माय इलेव्हन्थ प्लेस’ असं नाव दिलं आहे.
सई ताम्हणकरच्या सांगली ते मुंबई या प्रवासातील अकराव्या आणि हक्काच्या पहिल्या घरासाठी शुभेच्छा देत प्रिया बापट लिहिते, “कष्ट, प्रेम, जिव्हाळा आणि प्रचंड इच्छा शक्तीने तू हे घर बनवलं आहेस. स्वप्न, आकांक्षा, आशीर्वाद आणि महत्वाकांक्षेने परिपूर्ण अशी ही जागा…तुझं नवं घर अगदी तुझंच मूर्त स्वरूप आहे. सई तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुला भरपूर प्रेम!” प्रियाची ही पोस्ट सईने रिशेअर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App