यापूर्वी भाजपच्या पहिल्या यादीत 37 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यावेळी पक्षाने 39 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. MP Election 2023 BJP has announced the list of 39 candidates six women have been given election tickets
यावेळी भाजपने केंद्रीय मंत्री आणि खासदारांनाही विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर, प्रल्हाद पटेल, फग्गनसिंग कुलस्ते यांना रिंगणात उतरवले आहे. भाजपाने दुसऱ्या यादीत 39 पैकी 6 महिलांना तिकीट दिले आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या इमरती देवी यांना तिकीट देण्यात आले आहे. डबरा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्या हरल्या होत्या. कैलाश विजयवर्गीय यांची इंदूरमधील क्रमांक 1 वरून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. संजय शुक्ला सध्या काँग्रेसचे आमदार आहेत.
कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा आकाश विजयवर्गीय हा इंदूरच्या ३ क्रमांकाच्या विधानसभा मतदारसंघातून आमदार आहे. खासदारांमध्ये गणेश मंत्री, राकेश सिंह आणि रीती पाठक यांना तिकीट देण्यात आले आहे. छिंदवाडा या हायप्रोफाईल सीटवरून कमलनाथ यांच्या विरोधात भाजपचे विवेक बंटी साहू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी भाजपच्या पहिल्या यादीत 37 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. भाजपने आतापर्यंत मध्य प्रदेशातील 230 विधानसभा मतदारसंघांपैकी 76 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App