नेदरलॅंडमधील आइंडहोव्हन शहरात ढोल-ताशांच्या गजरात निघाली गणरायाची जंगी मिरवणूक


आइंडहोव्हन मराठी मित्र मंडळ व रमणबाग युवा मंच जर्मनी यांच्या सयुंक्त उपक्रमातून ही मिरवणूक उत्साहात  पार पडली.

विशेष प्रतिनिधी

आईंधोवन  : नेदरलॅंड या देशामधील आईंधोवन या शहरामध्ये प्रथमच गणपती बाप्पाची ढोल, ताशा व लेझीमच्या गजरात जंगी वाजतगाजत भव्यदिव्य मिरवणूक संपन्न झाली. आइंडहोव्हन मराठी मित्र मंडळ व रमणबाग युवा मंच जर्मनी यांच्या सयुंक्त उपक्रमातून ही सुंदर मिरवणूक पार पडली. Procession of Lord Ganesha to the beat of drums in Eindhoven Netherlands

मिरवणुकीदरम्यान भारतीय संस्कृतीमधील विविधता, नृत्य, खाद्य व पेहराव अशा माध्यमामधून दाखविण्यात आली. यावेळी भारतीय समुदायासह इतर देशीय नागरिक सुद्धा सहभागी झाले आणि या सुंदर क्षणांचे साक्षीदार झाले. अगदी लोकमान्यांना अभिप्रेत असावा असा एक सर्वसमावेशक उत्सव पार पडला.

आइंडहोव्हन मराठी मित्र मंडळ इतर भारतीय समुदाय व मंडळांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली संस्कृती जतन करून ती भावी पिढीपर्यंत पोहचविण्याचे कार्य वर्षानुवर्षे करत आहे. यंदाचा गणेशोत्सव हा त्याचेच एक प्रतिबिंब होता असे म्हणायला हरकत नाही.

Procession of Lord Ganesha to the beat of drums in Eindhoven Netherlands

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात