उपद्रवींनी उपायुक्त कार्यालयाची तोडफोड केली आणि दोन चारचाकी गाड्या पेटवून दिल्या.
विशेष प्रतिनिधी
इंफाळ : मणिपूरमध्ये मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या वडिलोपार्जित घरावर जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण सुरक्षा दलांनी तो हाणून पाडला. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार पोलिसांनी सांगितले की, यावेळी सुरक्षा दलांनी जमावाला पांगवले. Manipur Violence A mob targeted Chief Minister Biren Singhs ancestral home in Manipur
मात्र, मुख्यमंत्री बिरेन सिंग हे त्यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानी राहत नसून ते अधिकृत निवासस्थानी राहतात. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “इंफाळमधील हिंगांग भागात मुख्यमंत्र्यांच्या वडिलोपार्जित घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरक्षा दलांनी जमावाला घरापासून सुमारे 100 मीटर अंतरावर रोखले. आता घरात कोणीही राहत नाही, तरी त्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे,” अधिकारी म्हणाले.
सोमवारपासून (25 सप्टेंबर) मणिपूरमध्ये पुन्हा तणाव पसरला आहे, जेव्हा जुलैपासून बेपत्ता असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. मंगळवार आणि बुधवारी दोन तरुणांच्या मृत्यूप्रकरणी विद्यार्थ्यांनी हिंसक निदर्शने केली.
Ujjain Rape Case : पोलिसांच्या तावडीतून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना आरोपी झाला गंभीर जखमी
जमावाने गुरुवारी (२८ सप्टेंबर) पहाटे इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील उपायुक्त कार्यालयाची तोडफोड केली आणि दोन चारचाकी गाड्या पेटवून दिल्या. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकार्यांनी सांगितले की, उरीपोक, यास्कुल, सगोलबंद आणि टेरा भागात निदर्शकांची सुरक्षा दलांशी चकमक झाली, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रूधुराच्या अनेक गोळ्यांचा वापर करावा लागला. या कारवाईत अनेक लोक व काही जवान जखमी झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App