Aadhaar Data Leak : 81.5 कोटी भारतीयांचा आधार आणि पासपोर्ट संबंधित डेटा ‘डार्क वेब’वर झाला लीक

maharashtra cyber cell busts sextortion gang in mumbai

आतापर्यंत या डेटा लीक प्रकरणावर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : डार्क वेबवर आधार लीकचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, अमेरिकन कंपनी रिसिक्युरिटीचा दावा आहे की, ८१.५कोटी भारतीयांचा आधार आणि पासपोर्ट संबंधित डेटा डार्क वेबवर लीक झाला आहे. नाव, फोन नंबर, पत्ता, आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती ऑनलाइन विकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. Aadhaar Data Leak Aadhaar and passport related data of 81.5 crore Indians were leaked on the dark web

अमेरिकन फर्मने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की ९ ऑक्टोबर रोजी ‘pwn0001’ या व्यक्तीने  ब्रीच फोरमवर एक पोस्ट शेअर केली. त्याने ८१.५ कोटी भारतीयांच्या आधार आणि पासपोर्टशी संबंधित रेकॉर्डशी संबंधित माहिती दिली आणि ती विकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा अहवालानुसार, त्या व्यक्तीने आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती ८०  हजार डॉलरमध्ये विकण्याची ऑफर दिली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्याचा डेटा लीक इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) कडून असू शकतो. बिझनेस स्टँडर्डने वृत्त दिले आहे की ICMR ने अद्याप यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही. pwn0001 द्वारे शोधलेल्या या डेटा लीकची सीबीआय चौकशी करत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

हॅकरने ही देखील माहिती दिली आहे की, भारतातील सर्वात मोठा डेटा लीक म्हणजे हॅकर्सनी ८० कोटींहून अधिक भारतीयांचा खासगी डेटा लीक केला आहे. लीक झालेल्या डेटामध्ये नाव, वडिलांचे नाव, फोन नंबर, पासपोर्ट नंबर, आधार क्रमांक आणि वयाची माहिती आहे. मात्र, आतापर्यंत या डेटा लीक प्रकरणावर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Aadhaar Data Leak Aadhaar and passport related data of 81.5 crore Indians were leaked on the dark web

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात