कोणाच्या जोरावर छाती फुगवता, तुमचा उध्दव आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आलाय, नितेश राणे यांचा हल्लाबोल


तुमचा उद्धव आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ? असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी केला आहे.


प्रतिनिधी

मुंबई : तुमचा उद्धव आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ? असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी केला आहे. Your Uddhav has rubbed his nose in front of our Modi Saheb, Nitesh Rane’s attack

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोचार्ने काढलेल्या फटकार मोर्चावरून शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले होते. यावेळी भाजपच्या पदाधिकाºयांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरुनच नितेश राणे यांनी टीका केली आहे. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये नितेश राणे यांनी म्हटले आहे की, जाऊन सांगा आज सेनाभवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..तुमचा उद्धव.. आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ? मानले मुंबईतील भाजप युवा मोर्चाला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. हाच संदर्भ देऊन नितेश राणे यांनी ही टीका केलीआहे.

अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला होता. मात्र शिवसेना भवनापासून 5 किमी अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतले. पोलिसांच्या व्हॅनमधून भाजप कार्यकर्त्यांना घेऊन जात असताना शिवसेना भवनासमोर उपस्थित असलेल्या शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यावेळी काही शिवसैनिकांनी भाजपच्या पदाधिकाºयांना आणि महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला गेला आहे.

Your Uddhav has rubbed his nose in front of our Modi Saheb, Nitesh Rane’s attack

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती