मराठा सेवा संघाचे कार्य हे कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नसून, केवळ खरा इतिहास लोकांसमोर आणण्याचे आहेWill unite all Maratha organizations and fight for reservation – MLA Tanaji Sawant
विशेष प्रतिनिधी
पुणे : काल मराठा सेवा संघ पुणे शहराच्या वतीने ३ जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती ते १२ जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंतीपर्यंत दशरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार सावंत बोलत होते.
” विखुरलेला मराठा समाज एकत्र करण्याचे कार्य जिजाऊंच्या विचारांनी झाले, त्याच विचाराने सर्व मराठा संघटनांना एकत्रित करून मराठा आरक्षणासाठी लढा दिला जाईल”, असे प्रतिपादन आमदार तानाजी सावंत यांनी केले.
मराठा सेवा संघाचे कार्य हे कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नसून, केवळ खरा इतिहास लोकांसमोर आणण्याचे आहे. तसेच जिजाऊ यांच्या जयंतीदिनी लाल महाल येथे मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तंजावर तमिळनाडू येथील व्यंकोजीराजे यांचे वंशज विजयराजे भोसले यांच्या हस्ते जिजाऊरत्न सन्मान आणि जिजाऊ स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App