भीती वाटली की शिवसैनिक सत्तेचा विषय आला की मात्र आठवत नाही, नारायण राणे यांची टीका


विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत म्हटले आहे की सत्तेचा विषय आला की शिवसैनिक आठवत नाही आणि अशी भीती वाटल्यावर शिवसैनिक आठवतो. शिवसेनाप्रमुखांचा दरारा होता, तो आज दिसत नाही.When in fear Shiv Sainiks remember Narayan Rane’s criticism on Udhav Thakrey

राणा दांपत्याला अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले,बाळासाहेब ठाकरे यांनी हात वर केला की लाखो शिवसैनिक जमायचे. मात्र उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर कुणीही शिवसैनिक बाहेर पडत नाही. इथे येण्यापूर्वी मी मुद्दाम मातोश्री आणि राणा दाम्पत्याच्या घराबाहेरचे शिवसैनिक मोजायले सांगितले होते.



मातोश्रीच्या बाहेर फक्त २३५ शिवसैनिक आणि राणांच्या घराबाहेर केवळ १२५ शिवसैनिक उपस्थित आहेत.राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. पोलिसांच्या सहकायार्ने सरकार पुरस्कृत गुंडगिरी सुरू असून, ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना आहे.

भाजप लोकशाही मागार्ने चालणारा पक्ष असला तरी समोरून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर भाजप शांत बसणार नाही, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

When in fear Shiv Sainiks remember Narayan Rane’s criticism on Udhav Thakrey

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात