इडी, सीबीआय, एनसिबी ज्या पद्धतीने करत आहे, ते पाहिल्यास वाटते, त्यांचेही खाजगीकरण झाले की काय… ; संजय राऊत


विशेष प्रतिनिधी

मुबंई : सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहे. शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोक या सदरातून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

The way ED, CBI, NCB are doing it, it seems that they have also been privatized …; Sanjay Raut

सरकार पाडण्यासाठी भाजप कडून सातत्याने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांवर संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणतात, भाजपला राज्यातील सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये घालवायचं आहे. सरकार घालवण्याची ही कोणती अलोकशाही पद्धत? नागपुरातून काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, आठेक दिवसात सरकार पाडू असं नागपुरातले भाजपवाले बोलताहेत. सरकार पाडू आणि सरकार पडेल यामध्ये राज्यातील विरोधी पक्ष अडकून पडला आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.


ANIL DESHMUKH: अनिल देशमुखांना उच्च न्यायालयाकडूनही ED कोठडीचा निर्णय


अनिल देशमुख यांना नुकताच अटक करण्यात आली आहे. ज्यांनी आरोप केले होते ते पळून गेले आणि आता तर त्याने आरोप देखील नाकारले आहेत. देशमुख यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे केंद्रीय तपास यंत्रणेकडे नाहीयेत. तरीसुद्धा त्याबद्दल भाजप जल्लोष करताना दिसून येत आहे. ही मनमानी आहे. मस्तवालपणा आहे. आणि विकृत तानाशाही आहे. असे या लेखात संजय राऊत यांनी नमूद केले आहे.

त्याचप्रमाणे तुरुंगाच्या खासगीकरनाबद्दल ते म्हणतात, रेल्वेपासून एअर इंडियापर्यंत सगळ्याच गोष्टींमध्ये खासगीकरण झाले आहे. इडी, सीबीआय, एनसिबी ज्या पद्धतीने करत आहे, त्या पाहिल्यास असे वाटते की त्यांचेही खाजगीकरण झाले की काय. राज्यात त्याला तुरुंगात टाकू, ह्याला तुरुंगात टाकू, असे भाजपचे नेते सांगतात. तेव्हा देशात तुरुंगातही खासगीकरण झाले का? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. पण मोदी है तो मुमकिन है, अशावेळी हे खरे वाटते. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

The way ED, CBI, NCB are doing it, it seems that they have also been privatized …; Sanjay Raut

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था