उरवडे आगीच्या चौकशी अहवालानंतर जबाबदारी निश्चित होईल, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती


प्रतिनिधी

पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला आग कशामुळे लागली, याला जबाबदार कोण यासाठीच्या चौकशीसाठी शासनाने समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त होईल.The responsibility will be decided after the investigation report of Urwade fire, informed Home Minister Dilip Walse Patil

चौकशीचा प्राथमिक अहवाल प्राप्त होताच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल, व आगीच्या चौकशी अहवालानंतर जबाबदारी निश्चित होईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.



मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीची  पाहणी करण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी सकाळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच  मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले.

यावेळी त्यांच्यासमवेत खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे,  रुपाली चाकणकर, संतोष मोहोळ  यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक लोकप्रतिनिधी, एमआयडीसीचे अधिकारी यांच्याकडून या दुर्देवी घटनेची माहिती घेतली.

वळसे पाटील म्हणाले, या उद्योगात अनेक गोष्टी ज्वलनशील असल्याने आग सगळीकडे पसरली असून आगीचे कारण,जबाबदार कोण याबाबतची कारवाई,  अहवाल आल्या नंतर होईल. प्राथमिक अहवाल आजच प्राप्त होईल. डीएनए टेस्ट करूनच मृतदेह ओळखता येतील त्याशिवाय ओळखता येणार नाहीत, यासाठी ससूनमध्ये दोन ते तीन दिवस लागू शकतात.

The responsibility will be decided after the investigation report of Urwade fire, informed Home Minister Dilip Walse Patil

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात