खानावळीच्या आचाऱ्यांकडून घरफोड्या; पुण्यातील खळबळजनक घटना उघड


वृत्तसंस्था

पुणे: खानावळीतील आचाऱ्याने घरफोड्या केल्याचे उघड झाले आहे. आरोपीकडून ७७ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक किलो चांदीच्या वस्तू व दागिने, दोन दुचाकी, १ टीव्ही व ४६ हजार रुपये असा एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. The burglar was working as a cook in a restaurant,Arrested by police

आकाश अशोक उमाप (रा. वानवडी) असे त्याचे नाव आहे. आचारी म्हणून काम करताना तो डबे पोचवत होता. तेव्हा तो बंद घरांची रेकी करत होती. त्याची माहितीसाथीदारांना देत असे. त्यानंतर ते घरफोडी करत होते.

पोलिस अंमलदार नितीन मुंढे यांना हडपसर येथील जबरी चोरीचा गुन्हा एका आचार्‍याने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वानवडीतील विकासनगर भागात सापळा रचून आकाश उमाप याला पकडले. चौकशीत त्याने “मी स्वत: आचारी असून लोकांना डबे पुरविण्याचे काम करतो. तुम्हाला माझ्याबाबत मिळालेली माहिती चुकीची आहे.” असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याने कबुली दिली.

उमाप हा वानवडी परिसरातील एका मेसमध्ये जेवण बनविण्याचे व डबे पोचविण्याचे काम करत आहे. तेव्हा पुण्यातील विविध परिसरात बंद घरांची रेकी तो करत होता. साथीदारांना त्याची माहिती देत होता. सराईत गुन्हेगार जयसिंग कालुसिंग जुन्नी ऊर्फ पिलु, सोमनाथ ऊर्फ सोम्या गारुळे (दोघे रा. बिराजदारनगर, हडपसर) यांच्या सोबत त्याने घरफोडी, जबरी चोरी, वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात