उध्दव ठाकरे, अजित पवार उद्या पंतप्रधानांना भेटणार; मराठा आरक्षण, कोरोनावर चर्चा

प्रतिनिधी

मुंबई – महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या पेटलेला मराठा आरक्षणाचा विषय तसेच कोरोनाची भयावह परिस्थिती, लॉकडाऊन उठविण्याचे पाच टप्पे यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेणार आहेत. CM uddhav thackeray and DyCM ajit pawar to meet PM narendra modi over maratha reservation issue

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिली. त्यानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ उद्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. यावेळी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि तौते चक्रीवादळ मदतीसंदर्भात चर्चा केली जाईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात राज्यातील करोना स्थितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रात नुकतेच निर्बंध शिथील करण्यात आले असून मुंबई तसंच राज्याच्या कामगिरीची दखल देशपातळीवर घेण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री आणि राज्यातील नेत्यांमध्ये अनेकदा शाब्दिक युद्धही रंगलं. त्यामुळे या बैठकीत अजून कोणती चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.तसेच मराठा आरक्षण प्रश्नात राज्य सरकारची भूमिका संशयास्पद आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार असताना त्यांनी दिलेले मराठा आरक्षण हायकोर्टात टिकले होते. ठाकरे – पवार सरकारने मात्र, सुप्रिम कोर्टात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नीट बाजू मांडली नाही म्हणून आरक्षण रद्द झाले. त्यावरून महाराष्ट्रात बरेच राजकारण रंगले आहे.

ठाकरे – पवार सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात केंद्र सरकारला ओढण्याचा प्रयत्न चालविला आहे. सुप्रिम कोर्टातून केंद्र सरकारने मराठा आरक्षण मिळवून देण्याचा ठाकरे – पवार सरकारचा आग्रह आहे. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे – अजित पवार यांची पंतप्रधानांसमवेत बैठक होत आहे.

CM uddhav thackeray and DyCM ajit pawar to meet PM narendra modi over maratha reservation issue

महत्त्वाच्या बातम्या