Maharashtra became Covid Death capital of India, ranks 10th in World See Graphics

४५३ दिवसांत १ लाख बळी : कोरोना मृत्यूंच्या बाबतीत जगात १०व्या क्रमांकावर राज्य, देशातील २९% मृत्यू एकट्या महाराष्ट्रात

Maharashtra became Covid Death capital of India : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान या साथीचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्रातील लोकांना बसला आहे. गेल्या दीड वर्षात राज्यात 1 लाखाहून अधिक जण या साथीच्या आजारामुळे मरण पावले आहेत. एकूण मृत्यूंच्या बाबतीत महाराष्ट्र संपूर्ण जगात दहाव्या क्रमांकावर आहे, तर भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. एक लाख मृत्यूच्या आकडेवारीसह महाराष्ट्राने जगातील २१२ देशांना मागे टाकले आहे. तसेच असे अनेक देश आहेत ज्यांची लोकसंख्या राज्यातील मृतांच्या आकड्यांपेक्षाही कमी आहे. Maharashtra became Covid Death capital of India, ranks 10th in World See Graphics


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान या साथीचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्रातील लोकांना बसला आहे. गेल्या दीड वर्षात राज्यात 1 लाखाहून अधिक जण या साथीच्या आजारामुळे मरण पावले आहेत. एकूण मृत्यूंच्या बाबतीत महाराष्ट्र संपूर्ण जगात दहाव्या क्रमांकावर आहे, तर भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. एक लाख मृत्यूच्या आकडेवारीसह महाराष्ट्राने जगातील २१२ देशांना मागे टाकले आहे. तसेच असे अनेक देश आहेत ज्यांची लोकसंख्या राज्यातील मृतांच्या आकड्यांपेक्षाही कमी आहे.

भारतातील एकूण मृत्यूंपैकी 29% मृत्यू महाराष्ट्रात

गेल्या 24 तासांत राज्यात 618 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत 3 लाख 47 हजार 28 जण मरण पावले आहेत, त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 1 लाख 130 मृत्यू झाले आहेत. म्हणजेच देशातल्या मृत्यूंपैकी 29% मृत्यू फक्त महाराष्ट्रात घडले आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेत मृतांचा आकडा जास्त होता. यादरम्यान लोकांना बेड, आवश्यक औषधे आणि ऑक्सिजनचा तुटवडा सहन करावा लागला.

दररोज सरासरी 220 जणांचा मृत्यू

मागील वर्षी 9 मार्च रोजी राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून 453 दिवसांत राज्यात 1 लाख 130 जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच दररोज सरासरी 220 जण मरण पावले. संसर्गामुळे होणारा पहिला मृत्यू 17 मार्च 2020 रोजी झाला. 31 मार्चपर्यंत मृतांची संख्या 10 वर पोहोचली होती. तोपर्यंत 302 रुग्णांची नोंद झाली होती.

 

Maharashtra-covid-death-graphics.

 

पहिले 50 हजार मृत्यू 10 महिन्यांत, तर दुसरे फक्त 5 महिन्यांत झाले

राज्याच्या मृत्यू लेखा परीक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे म्हणाले की, साथीच्या रोगाच्या पहिल्या 10 महिन्यांत (मार्च ते डिसेंबर 2020 दरम्यान) महाराष्ट्रात जवळपास 50,000 मृत्यू झाले. जानेवारी ते 6 जून या कालावधीतील दुसर्‍या पाच महिन्यांत 50 हजारांहून अधिक जण मरण पावले आहेत. 9 मार्च 2020 पहिला रुग्ण आढळला होता. 31 डिसेंबर 2020 दरम्यान राज्यात 49,521 मृत्यू झाले. 1 जानेवारीपासून राज्यात 50,609 मृत्यू झाले आहेत. 2020 मध्ये महाराष्ट्रात 19 लाख एकूण रुग्ण झाले. यावर्षी हा आकडा वाढून 40 लाखांवर पोहोचला आहे.

Maharashtra became Covid Death capital of India, ranks 10th in World See Graphics

30 दिवसांत 4.53 लाख सक्रिय रुग्णांत घट

महाराष्ट्रातील मृतांची संख्या भयावह आहे, परंतु संक्रमित लोकांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. गेल्या 30 दिवसांत, सक्रिय रुग्णांच्या संख्येत 71% घट झाली आहे. अवघ्या 30 दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाख 53 हजार 548 ने कमी झाली आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात 12,557 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच वेळी 14,433 रुग्ण बरे झाले आणि त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले, त्यानंतर आता बरे झालेल्यांची संख्या 55 लाख 43 हजार 267 वर गेली आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण आता 95.05% आहे आणि मृत्यू दर 1.72% आहे. सध्या राज्यात 1 लाख 85 हजार 527 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Maharashtra became Covid Death capital of India, ranks 10th in World See Graphics

महत्त्वाच्या बातम्या