पुणेकरांना लोकल सुरु होण्याची प्रतीक्षा; एसटी, पीएमपीला परवानगी मग लोकल का नाही ?


वृत्तसंस्था

पुणे : राज्यात आजपासून अनलॉक सुरू होत आहे. त्यामुळे त्यात लोकलसेवेचा समावेश करावा, अशी मागणी पुणेकर प्रवाशातून होत आहे. दरम्यान, एसटी, पीएमपीला परवानगी आहे, मग लोकल का नाही ? असा प्रश्न सामान्य प्रवाशांना पडला आहे. Punekars waiting for Local to start; ST, PMP allowed then why not local?

गेल्या आठ महिन्यांपासून पुणे-लोणावळा लोकल तसेच पुणे-दौंड शटल (डेमू) या दोन्ही सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच उपलब्ध आहेत. सामान्य प्रवाशांना आता या सेवेचा लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे.



राज्य सरकारने अनलॉकबाबत स्थानिक प्रशासनाला परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. पुण्यात आजपासून सर्व दुकाने सुरू होत आहेत. एसटी आणि पीएमपी सेवा सुरू होत असताना लोकल सेवादेखील पूर्ववत व्हावी अशी मागणी होत आहे.

पुणे-लोणावळा लोकलमधून रोज सरासरी ५० ते ६० हजार प्रवासी प्रवास करतात. तर दिवसाभरात ४० ते ५० फेऱ्या होतात. सध्या अत्यावश्यक सेवे अंतर्गत चार फेऱ्या होत आहेत. पुणे-लोणावळा लोकल व पुणे-दौंड शटल सेवा सुरू झाल्यावर पुणेकरांची मोठी सोय होणार आहे.

Punekars waiting for Local to start; ST, PMP allowed then why not local?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात