ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कला कन्यारत्न


ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल यांच्या संसारात कन्यारत्नाचे आगमन झाले आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या प्रवक्त्यानं ही गोड बातमी दिली आहे.Britain’s royal couple Prince Harry and Megan Markl blessed with baby


विशेष प्रतिनिधी

लंडन : ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल यांच्या संसारात कन्यारत्नाचे आगमन झाले आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या प्रवक्त्यानं ही गोड बातमी दिली आहे.

हॅरी आणि मेगन यांना शुक्रवारी कन्यारत्न प्राप्त झालं असून लिलिबेट लिली डायना असे या चिमुकलीचं नाव ठेवण्यात आलं आहे. लिलिबेट हे महाराणीचं लोकप्रिय नाव आहे.डायना हे नाव प्रिन्स हेरी यांच्या आईच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. याबाबत माहिती होताच, जगभरातून शाही कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सर्वांचे आभारही कुटुंबीयांकडून मानण्यात आले आहेत.

हेरी आणि मर्केल यांना पहिला मुलगा असून त्याचे नाव आर्ची आहे. २०१८ मध्ये प्रिन्स हॅरी व मेगन मार्केल लग्नबंधनात अडकले होते. हॉलिवूडची अभिनेत्री मेगन मार्केल घटस्फोटित असून अमेरिकन टीव्ही मालिका सुट्समध्ये तिने प्रमुख भुमिका साकारली होती.

त्यानंतर २०११ मध्ये तिने अमेरिकन निमार्ता ट्रेवर एंजलसनसोबत लग्न केले होते. मात्र, २०१३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. प्रिन्स हॅरी आणि मेगनची भेट २०१६ मध्ये एका मित्राच्या घरी झाली होती. त्यानंतर, हॅरीने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, तो मेगनने मान्य केला होता. प्रिन्स हॅरी ३३ वर्षांचे असून मेगन ३६ वर्षांची आहे.

Britain’s royal couple Prince Harry and Megan Markl blessed with baby

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था