पुणे शहरात आज 72 केंद्रांवर लसीकरण मोहिम; कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी 100 डोस

वृत्तसंस्था

पुणे : पुणे महापालिकेच्या ५६ केंद्रांवर आज (सोमवारी) कोव्हिशिल्ड तर १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध आहेत. लसीचे प्रत्येकी १०० डोस पुरविले आहेत. Vaccination at 70 centers in Pune on Monday; 200 dose will be Avalible

लसीकरण बुकिंगसाठी सोमवारी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे़. याव्दारे कोव्हिशिल्डकरिता केवळ ४५ वर्षांपुढील नागरिकांना नोंदणी करता येणार आहे. १० मे पूर्वी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे. त्यांनाही नोंदणी करता येईल.कोव्हिशिल्ड लसीच्या साठ्यापैकी ६० टक्के लस ही ऑनलाईन बुकिंग करून अपॉईमेंट घेतलेल्या नागरिकांना दिली जाईल. तर उर्वरित ४० टक्के लस ही दिव्यांग नागरिक, स्तनदा माता, हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व ४५ वयावरील नागरिकां केंद्रावर ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून दिली जाईल. तसेच शिल्लक डोस हे १५ मार्च पूर्वी म्हणजे ८४ दिवसांपूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध

कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस १० मे पूर्वी ज्यांनी घेतला आहे. त्यांना आज १६ दुसरा डोस केंद्रावर उपलब्ध राहणार आहे़ ६० टक्के लस ही ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना व ४० टक्के लस ही ऑन दि स्पॉट दिली जाणार आहे़. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला जाणार नाही़.

Vaccination at 70 centers in Pune on Monday; 200 dose will be Avalible

महत्त्वाच्या बातम्या