भज्जी तू सुध्दा खलिस्थानवादी! क्रिकेटपटू हरभजनसिंगने केला जर्नलसिंग भिद्रानावलेचा गौरव, शहीद म्हणून केला प्रणाम


क्रिकेटपटू हरभजनसिंग याने खलिस्थानवादी दहशतवादी जर्नलसिंग भिद्रानवालेचा गौरव गेला असून त्याला शहीद म्हणून प्रणाम केला आहे. हरभजनच्या या कृत्यावर प्रचंड संताप व्यक्त होत असून भज्जी तू सुध्दा! असे म्हणत त्याला सुनावले आहे.Bhajji, you are also a Khalistanist! Cricketer Harbhajan Singh honors Journalist Singh Bhidranavale, pays homage to him as a martyr


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : क्रिकेटपटू हरभजनसिंग याने खलिस्थानवादी दहशतवादी जर्नलसिंग भिद्रानवालेचा गौरव गेला असून त्याला शहीद म्हणून प्रणाम केला आहे. हरभजनच्या या कृत्यावर प्रचंड संताप व्यक्त होत असून भज्जी तू सुध्दा! असे म्हणत त्याला सुनावले आहे.

पंजाबमधील अमृतसर येथे खलिस्थानवाद्यांना बाहेर काढण्यासाठी राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा आज ३७ वा वर्धापनदिन आहे. यानिमित्ताने इन्स्टाग्रामवर हरभजनने भिद्रानवाले याचा शहीद म्हणून गौरव केला आहे. या पोस्टमध्ये जर्नलसिंग भिद्रानवाले याचा निळ्या रंगाची पगडी घातलेला फोटो आहे.दरम्यान, आज अमृतसर येथील हरमंदिर साहिब येथे खलिस्थानी झेंडे नाजविले गेले. खलिस्थानवादी दहशतवादी संघटना असलेल्या दल खालसाच्या वतीने खलिस्थान दिवस साजरा केला. त्यासाठी रॅलीही काढली होती.

खलिस्थानच्या मागणीसाठी ८० च्या दशकात खलिस्थानवादी चळवळ सुरू झाली होती. शिख धर्मियांसाठी सर्वात पवित्र धार्मिक स्थळ असणाऱ्या अमृतसरच्या सुवर्णमंदिरात खलिस्थानवादी दहशतवाद्यांनी आपला तळ तयार केला होता. फुटीरतावाद्यांनी जर्नेलसिंग भिंद्रानवाले यांच्या नेतृत्वाखाली सुवर्ण मंदिरावर कब्जा केला होता.

तेथून ते अतिरेकी कारवाया करीत होते. १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिर परिसरात लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. लष्करप्रमुख जनरल अरूणकुमार वैद्य यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईस ऑपरेशन ब्लू स्टार हे नाव देण्यात आले होते. या लष्करी कारवाईत जर्नेलसिंग भिंद्रानवाले याच्यासह अनेक अतिरेकी ठार झाले होते.

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलनातही पंजाबमधील आंदोलनात जर्नेलसिंग भिंदरवाले याच्याशी मिळता जुळता फोटो असलेले पोस्टर झळकावले होते. त्याचबरोबर अनेक सेलीब्रेटीही अनेकदा भिद्रानवालेचे कौतुक करतात. परंतु, हरभजनसिंग याच्यासारख्या प्रसिध्द क्रिकेटपटूने भिद्रानवालेचे कौतुक केल्याने टीकेची झोड उठली आहे.

Bhajji, you are also a Khalistanist! Cricketer Harbhajan Singh honors Journalist Singh Bhidranavale, pays homage to him as a martyr

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था