पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू, बॉम्ब फेकून केली हत्या


पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले सुरूच आहेत. बॉँब फेकून एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. भटपारा येथील भाजपा कार्यालयाजवळ 51 गावठी बॉम्ब सापडले होते.Another BJP worker killed in West Bengal


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले सुरूच आहेत. बॉँब फेकून एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. भटपारा येथील भाजपा कार्यालयाजवळ 51 गावठी बॉम्ब सापडले होते.

जयप्रकाश यादव या ३२ वर्षीय भाजपा कार्यकर्त्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. भाजपाने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर (टीएमसी) हल्ल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच भाजपाचे खासदार अर्जुन सिंह घटनास्थळी पोहोचले.



भाजपाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, टीएमसीच्या काही गुंडांनी दुपारी बॉम्ब फेकला. या हल्ल्यात कार्यकर्ता जयप्रकाश यादवचा जागीच मृत्यू झाला.याबाबत बोलताना खासदार अर्जुन सिंह म्हणाले एकही माणूस जगू शकत नाही, अशी बंगालमधील परिस्थिती आहे. तसेच पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.

राज्यात टीएमसीने दहशत पसरवली असून भाजपा कार्यकर्त्यांची हत्या करण्यात येत असल्याचा आरोप भाजपाकडून अनेकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षावर करण्यात येतो. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालचे भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांनी टीएमसीने गेल्या पाच वर्षात भाजपाच्या 166 कार्यकर्त्यांचा बळी घेतल्याचा आरोप केला होता.

टीएमसीने भाजपा कार्यकर्त्यांवर 30 हजार पेक्षा जास्त गुन्हे दाखल केले असून विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 37 कार्यकर्ते मारले गेले आहेत.

भाजपा कार्यालयाजवळील खिदिरपुर मोरे आणि हेस्टिंग्स क्रॉसिंग भागात 51 गावठी बॉम्ब सापडले होते. वेळेत बॉम्ब निष्क्रिय करण्यात आल्याने मोठा घात टळला. हे बॉम्ब कोणी ठेवले, याची चौकशी सुरू आहे.

Another BJP worker killed in West Bengal

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात