ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला, छगन भुजबळांचा फडणवीसांना फोन, म्हणाले- आम्ही अडचणीत, मदत करा!

OBC Reservation Issue Chhagan Bhujbal Called Ex CM Fadnavis To Talk With Central Govt

OBC Reservation Issue : राज्यात मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणाचाही मुद्दा तापला आहे. राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये महात्मा फुले समता परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीला कोरोना नियमांचं पालन करून 100 कार्यकर्ते हजर राहिल्याची माहिती भुजबळांनी माध्यमांना दिली. भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. विशेष म्हणजे, भुजबळांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही फोन करून मदत करण्याची विनंती केली आहे. OBC Reservation Issue Chhagan Bhujbal Called Ex CM Fadnavis To Talk With Central Govt


विशेष प्रतिनिधी

नाशिक : राज्यात मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणाचाही मुद्दा तापला आहे. राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये महात्मा फुले समता परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीला कोरोना नियमांचं पालन करून 100 कार्यकर्ते हजर राहिल्याची माहिती भुजबळांनी माध्यमांना दिली. भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. विशेष म्हणजे, भुजबळांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही फोन करून मदत करण्याची विनंती केली आहे.

भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणाला सहकार्य करण्याची मागणी करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांनाही फोन केला आहे. ओबीसी समाज सध्या अडचणीत आहे, आम्हाला दोष द्या परंतु त्यांच्यासाठी केंद्रीय पातळीवर मदत करा, अशी मागणी मी फडणवीसांकडे केल्याचं छगन भुजबळ म्हणाले. त्यांच्या या मागणीवर आपण केंद्र सरकारशी यावर बोलू, असं आश्वासनही फडणवीसांनी दिल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.

ओबीसींच्या 65 हजार जागा कमी झाल्या

भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले समता परिषदेच्या बैठकीत ओबीसी आरक्षणाचा निकाल समजावून सांगण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय राज्यासह संपूर्ण देशात लागू झाला आहे. ओबीसी आरक्षण 27 टक्के आहे. शिक्षण तसेच नोकरीतील आरक्षणाला धक्का लागलेला नाही. तथापि, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींच्या तब्बल 65 हजार जागा कमी झाल्या आहेत. आता इम्पेरियल डाटा गोळा होत नाही, तोपर्यंत स्थानिक निवडणुकीतील राजकीय आरक्षणाला बाधा येणार आहे. यासाठीच आम्ही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची भेट घेणार आहोत. तत्कालीन भाजप सरकारने तेव्हा इम्पेरियल डाटा दिला असता, तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता, असेही भुजबळ म्हणाले.

फडणवीस म्हणाले- 15 महिने हे सरकार गप्प राहिलं

ओबीसी आरक्षणावर टाच आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. फडणवीस म्हणाले की, ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना काही मंत्री मोर्चे काढत होते. मला राजकारण करायचं नव्हतं, पण मागच्या सरकारकडे बोट ठेवलं जात आहे. परंतु 15 महिने या सरकारने काहीही केले नाही. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाला जर राज्य सरकारने मागास आयोगाची स्थापना करून डाटा जमा करतोय हे जरी सांगितलं असतं, आरक्षण रद्द करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला नसता. परंतु, मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचं सोडून काही मंत्री फक्त मोर्चे काढत होते, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

OBC Reservation Issue Chhagan Bhujbal Called Ex CM Fadnavis To Talk With Central Govt

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात