नववी, दहावी, अकरावी आणि बारावी परीक्षेचा निर्णय उद्या ; राज्य शिक्षण विभागातर्फे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन

वृत्तसंस्था

मुंबई : राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पास करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. आता नववी, दहावी, अकरावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय घेण्यासाठी  उद्या शिक्षण विभागाची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.ninth, tenth, eleventh and twelfth examinations tomorrow Organizing important meetings by the state education department

त्यानंतर दुपारी 12.30 वाजता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड परिक्षेबाबत निर्णयाची घोषणा करतील.पहिली ते आठवीप्रमाणेच नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट पास करण्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेतल्या जाऊ शकतात.जर दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच घेतल्या गेल्या तर विकएन्ड लॉकडाऊनच्या वेळी शनिवारी येणाऱ्या पेपरसाठी काय करता येईल याबाबतही बैठकीत चर्चा होईल.

ninth, tenth, eleventh and twelfth examinations tomorrow Organizing important meetings by the state education department

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*