SSC HSC Exam 2021 Maharashtra : दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईनच ; परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल;वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

  • दहावी, बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच ऑफलाईनच होणार: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलंय.
  • या वर्षात मुलांचा लेखन सराव कमी झाल्याने मुलांना पेपर लिहीण्यासाठी जास्त वेळ देण्यात येणार आहे. त्यासाठी पेपर सकाळी 10:30 वाजता सुरू होईल.
  • https://mahahsc.in/notification/stimem21.pdf एका क्लिक वर मिळवा परीक्षेचा टाईम टेबल Maharashtra Board SSC Exam 2021 Date Sheet

विशेष प्रतिनिधी

मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा ऑफलाईन (लेखी परीक्षा) पद्धतीनुसार होणार आहे, अशी महत्वाची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा ही ठरलेल्या तारखेनुसारच होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. SSC HSC Exam 2021 msbshse Maharashtra exam will be held offline

कोरोनामुळे हे लेखी परीक्षा ही तुम्ही शिक्षण घेत असलेल्या शाळा किंवा कॉलेजमध्ये परीक्षा घेतली जाईल. जर वर्ग कमी असल्यास इतर शाळेत बैठक व्यवस्था केली जाईल, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.कधी होणार परीक्षा ?

दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 21 दरम्यान होईल.

बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान होईल.

लेखी परीक्षेनंतर 15 दिवसांनी प्रॅक्टिकल परीक्षा होईल.

22 मे ते 10 जून दरम्यान बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा होईल.

दहावी बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे.

तर या परीक्षांसाठी प्रवास करणारे विद्यार्थी आणि त्यांच्यासोबतचे पालक यांचं हॉलतिकीट पाहून त्यांना लोकलने प्रवास करू देण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

पेपर लिहिण्यास जास्त वेळ

गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव जास्त झालेला नाही. हे लक्षात घेत पेपर लिहीण्यासाठीची वेळ वाढवण्यात येत असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं.

40 ते 50 मार्कांच्या पेपरसाठी 15 मिनिटं जास्त वेळ देण्यात येईल.

विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी 30 मिनिटांचा जास्त वेळ देण्यात येईल. पेपर एकूण साडेतीन तासांचा असेल.

दिव्यांग विद्यार्थ्यांना पेपरसाठी 1 तासाचा जास्तीचा वेळ देण्यात येईल.

पास होण्यासाठीच्या 35 मार्कांच्या पातळीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*