पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने महादेव जानकर आयसोलेशनमध्ये राहणार आहेत.Mahadev Jankar was informed about the infection of corona by tweeting
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढतच चालली आहे.दरम्यान गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांना तसेच अभिनेत्यांना करोनाची लागण होत आहे. दरम्यान आता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना करोनाची लागण झाली आहे.महादेव जानकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
ट्विटमध्ये महादेव जानकर म्हणाले की , “प्रचंड प्रवास व विविध कार्यक्रम यामुळे कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती. त्यामुळे मी करोना टेस्ट केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने आयसोलेशनमध्ये राहणार आहे, याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे संपर्कात आलेल्यांनी स्वतःची तत्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी, असे आवाहन महादेव जानकर यांनी केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App