कंगना म्हणते ‘चंगु-मंगु’ गँग : महाराष्ट्र लॉकडाऊनवरून कंगनाचा पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा


बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते.


पंगा गर्ल महाराष्ट्र सरकारसोबत नेहमीच पंगा घेत असते. Kangana Ranaut Vs Maharashtra Government on Lockdown


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. कंगना बर्‍याचदा सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकारबद्दल वक्तव्य करत असते. तीने महाविकास आघाडी सरकारला चंगु-मंगु असे संबोधले होते .या वेळी आता अभिनेत्रीने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारबद्दल ट्विट करत जोरदार हल्लाबोल केला आहे.



महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार मुंबईतील कंगनाच्या कार्यालयातील बरेच अनधिकृत बांधकामाची तोडफोड करण्यात आली होती. ज्यानंतर अभिनेत्री सतत उद्धव सरकारवर कडक टीका करत असते.

कंगना रनौतने ट्विटवर एका दरवाजाचा फोटो शेअर केला आहे. हा दरवाजा समोरून बंद आहे. परंतु, हा दरवाजा सर्व बाजूंनी खुला आहे. हा दरवाजाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “महाराष्ट्र लॉकडाऊन असा आहे”. ज्यानंतर अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आली आहे.

‘महाराष्ट्रात कोरोनाचे प्रकरण वाढतच चालले आहेत. ज्यामुळे राज्य सरकारने 15 दिवसांचा लॉकडाऊन लादला आहे.

जिथे या संपूर्ण लॉकडाऊनला राज्यात अतिशय मिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. बरेच लोक त्याचे योग्यरित्या अनुसरण करत आहेत, तर काही लोक अजूनही रस्त्यावर फिरत आहेत.

लॉकडाऊनबद्दल बोलताना कंगना म्हणाली, ‘निर्णायक निर्णय झाला पाहिजे. चंगू मंगू यांचं अस्तिस्व सध्या संकटात आहे..’ कंगनाच्या अशा वक्तव्यामुळे ती सध्या जोरदार चर्चेत आहे. सांगायचं झालं तर सोशल मीडियावर कंगनाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टवर नेटकरी प्रतिक्रिया देत असतात.

Kangana Ranaut Vs Maharashtra Government on Lockdown

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात