विशेष प्रतिनिधी
पुणे : शिवसेना नेत्याने बलात्कार केलेल्या मुलीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. शिवसेना नेते रघुनाथ कुचिक त्याला जबाबदार आहेत.या मुलीबाबत आपण गृहमंत्र्यांसह पोलिसांनाही कळवलं. मात्र एकानंही याची दखल घेतली नाही. या मुलीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं, तर त्याला पोलिस आणि राज्य सरकार जबाबदार असेल,If the girl who was raped by Shiv Sena leader is dead, then the state government is responsible, emotional call of Chitra Wagh
अशी भावननिक साद भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी घातली आहे.चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की अत्यंत व्यथित होऊन मी हा व्हिडीओ करतेय. कुचिक यांनी एका मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर जबरदस्ती तिचा गर्भपात केला. या सगळ्याबाबत पुरावे असतानाही त्यांना जामीन कसा मिळतो. त्याला राज्यमंत्री दर्जा दिला आहे.
या मुलीनं समोर येऊन या सगळ्या गोष्टी सांगितल्या. एवढ्या गोष्टी पुरावे असतानाही त्यांन जामीन कसा मिळतो, हे मला माहीत नाही. दोनदा त्यांना जामीन मिळालाय. कुचिक त्या मुलीवर दबाव आणत आहेत. केस मागे घेण्यासाठी तिला मेसेज करतोय. या कुचिक यांच्या मागे त्यांचा करता करविता आणि बोलविता धनी कोण आहे?
म्हणून या पीडिती मुलीनं फेसबुकवर पोस्ट टाकून मी स्वत:ला संपवेत, असं लिहिलंय. या मुलीनं जर तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं आणि त्यात ही मुलगी मेली तर त्याची सगळी जबाबदारी कुचिकसोबत पुणे पोलीस आणि राज्य सरकारचीही असेल.
तिने केलेल्या सगळ्या पोस्ट मी पुणे पोलिसांना, गृहमंत्र्यांनी, सीपींना पाठवल्यात. कित्येक फोन मी त्यांना केलेत. मेसेज केलेत. पण एकानंही फोन उचलला नाही. मेसेज पाहून उत्तर दिलेलं नाही. मला कळकळून सांगायचं की वाचवा तिला. हात जोडून मी विनंती करतेय. झोपलेत का सगळे?
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App