वृत्तसंस्था
पुणे : पुणे नाशिक शहरांमधील दाट धुक्याची चादर पसरली असून सकाळी दहा वाजेपर्यंत 100 मीटर देखील दृश्यमान स्वरुप नव्हते. त्यामुळे वाहतूक सावकाश होती. त्याचबरोबर विमानांची उड्डाणे उशिरा करण्यात आली आहेत.Fog delay flights in pune for hours
पुणे विमानतळाच्या सूत्रांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने हे ट्विट केले आहे.धुक्याच्या दाट चादरीमुळे 100 मीटर पर्यंत देखील विसिबिलिटी नाही. त्यामुळे विमान उड्डाणे आम्ही काही तासांसाठी उशिरा ठेवली आहेत.
धुक्याची चादर दूर होताच विमान उड्डाणेंचे शेड्युल पूर्ववत करता येईल, असे पुणे विमानतळाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. पुणे आणि नाशिक शहरांमधील अन्य वाहतूकही कूर्मगतीने सावकाश होताना दिसत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App