चंद्रपूर : अचानक दुचाकीपुढे आला बिबट्या , भीषण अपघात ; सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू


वळणावर बिबट्या रस्ता ओलांडत असल्यामुळे वेगात येत असलेल्या पडोळे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले.Chandrapur: A leopard suddenly came in front of a two-wheeler, a terrible accident; Death of Assistant Sub-Inspector of Police


विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर : चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर बॉटनिकल गार्डन वळणावर दुचाकीपुढे बिबट्या आल्याने सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा भीषण अपघात झाला.दरम्यान या अपघातात दुर्दैवाने पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला. अविनाश पडोळे असे मृत्यू झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे.

घटना काय घडली ?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक अविनाश पडोळे भरदुपारी 12 वाजता बल्लारपूर येथून शहरात दुचाकीने जात होते. यावेळी चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन जात असताना त्यांच्यासमोर एक बिबट्या आला.वळणावर बिबट्या रस्ता ओलांडत असल्यामुळे वेगात येत असलेल्या पडोळे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले.आणि त्यांचा अपघात झाला.अपघातात अधिक रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताची घटना घडताच पोलिसांनी पथक पाठवून अधिक तपास सुरु केला आहे. मात्र अचानकपे पडोळे यांचा मृत्यू झाल्यामुळे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची अकाली एक्झिट झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Chandrapur: A leopard suddenly came in front of a two-wheeler, a terrible accident; Death of Assistant Sub-Inspector of Police

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण