ओमायक्रॉन या नवा व्हेरिएंटची भीती ;जमावबंदीसारखे निर्बंध लावणारा अकोला हा पहिलाच जिल्हा


ओमायक्रॉन रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासन ,आरोग्य विभाग, राज्य सरकार तसंच सतर्क झाले आहेत.याच पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.Fear of new variant of Omaicron; Akola is the first district to impose curfew


विशेष प्रतिनिधी

अकोला : कोविड-१९ च्या ओमायक्रॉन प्रकाराने लोकांमध्ये पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे.हा नवीन प्रकार डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही धोकादायक ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दरम्यान कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे राज्याची चिंता वाढवली आहे. कारण दक्षिण आफ्रिकेवरून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेला एक ३३ वर्षीय तरुण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे.दरम्यान रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासन ,आरोग्य विभाग, राज्य सरकार तसंच सतर्क झाले आहेत.याच पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन करण्यात येत आहे.कोरोनाचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट आढळून आल्यानंतर जमावबंदीसारखे निर्बंध लावणारा अकोला हा पहिलाच जिल्हा आहे.

अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्ह्यात या व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये जिल्ह्यात ४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून जमावबंदीचे आदेश निर्गमित केले आहेत.ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढू नये म्हणून अकोला जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निर्बंध लावण्यात आलेत.

Fear of new variant of Omaicron; Akola is the first district to impose curfew

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण