पुणेकरांसाठी मोठी दिलासादायक बाब ; झांबिया देशातून आलेला ‘ तो ‘ व्यक्ती ओमायक्रॉन निगेटिव्ह


दक्षिण आफ्रिकेजवळील झांबिया देशातून २० दिवसांपूर्वी तो व्यक्ती पुण्यात आला.Great relief for the people of Pune; The ‘he’ from Zambia is omicron omicron


विशेष प्रतिनिधी

पुणे : नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने राज्यात शिरकाव केला आहे.राज्यात पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेवरून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेला एक ३३ वर्षीय तरुण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेजवळील झांबिया देशातून २० दिवसांपूर्वी तो व्यक्ती पुण्यात आला.

दरम्यान कोरोनाबाधित आढळून आलेल्या त्या ६० वर्षीय व्यक्तीचा तपासणी अहवाल काल ( दि.४) प्राप्त झाला आहे. त्या तपासणीत सदर रुग्ण ओमायक्रॉन निगेटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. यामुळे पुणेकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.



अहवालात तो व्यक्ती ओमायक्रॉन निगेटिव्ह असून, त्याला डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली असल्याचे दिसून आले आहे.या प्रवाशाला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला होता व त्याला हलका तापही आला होता. त्यामुळे त्याची कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. तेव्हा तो कोरोनाबाधित आढळून आला.

 

दरम्यान ३० नोव्हेंबर रोजी खबरदारी चा उपाय म्हणून त्याची ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ म्हणजे जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचं ठरले व त्यासाठी त्याचा स्वॅब राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आला. त्यात तो ओमायक्रॉन निगेटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

Great relief for the people of Pune; The ‘he’ from Zambia is omicron negative

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात